अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून

By admin | Published: May 25, 2017 02:52 AM2017-05-25T02:52:25+5:302017-05-25T02:52:25+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया गुरुवारपासून (दि. २५) सुरू होत आहे.

The eleventh entrance process will start from today | अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून

अकरावीची प्रवेशप्रक्रिया आजपासून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया गुरुवारपासून (दि. २५) सुरू  होत आहे. दुपारी एकपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. मात्र, सध्या अर्जाचा केवळ पहिला भाग भरायचा आहे. दोन्ही पालिका क्षेत्रांतील राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच अर्ज भरावा लागेल. तर, दोन्ही पालिकांबाहेरील व इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अकरावीमध्ये प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश क्षमतेत वाढ झाली असून, एकूण २६७ महाविद्यालयांची एकूण ९४ हजार ५८० प्रवेश क्षमता आहे. अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा किंवा इतर कोणताही कोटा आणि आरक्षणासाठी आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी बुधवारी
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी समितीच्या सचिव व सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत उपस्थित होत्या.
प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे. या पुस्तिकेत लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याचा वापर करूनच अर्ज भरता येणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना केवळ अर्जाचा पहिला भाग
भरता येईल. यामध्ये वैयक्तिक माहितीसह आरक्षण, कोटा ही माहिती नमूद करावी लागणार आहे. तर, दहावीचा निकाल लागल्यानंतरच अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी सायबर कॅफे किंवा घरातूनही आॅनलाईन अर्ज भरू शकत होते.
मात्र, यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक शाळा, मार्गदर्शन केंद्रांवरच अर्ज भरणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणाहून अर्ज भरू नयेत, असे आवाहन टेमकर यांनी केले आहे.

राज्य मंडळाच्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांवर या विद्यार्थ्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना दहावीची परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधावा लागेल. अर्ज भरण्याचा कालावधीत जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांना बोलावून घेऊन अर्ज भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी
1 पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच अर्ज भरावा लागणार आहे. माहितीपुस्तिकाही शाळेतच मिळेल. त्यांचा अर्जही या शाळेतच अ‍ॅप्रूव्ह केला जाईल.
2दोन्ही पालिका क्षेत्रांबाहेरील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी झोननिहाय मार्गदर्शन
केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित मार्गदर्शन केंद्रांवर अर्ज भरता व अ‍ॅप्रूव्ह करता येईल.

महाविद्यालयांची संख्या
एकूण - २६७
एकूण शाखा - ५८४
माध्यमनिहाय महाविद्यालये
इंग्रजी - ४८६,
मराठी - २६७
हिंदी (एमसीव्हीसी) - १२
एकूण अल्पसंख्याक महाविद्यालये - ४८
अल्पसंख्याक प्रवेश क्षमता - २०,४९५
माध्यमनिहाय प्रवेश क्षमता
इंग्रजी - ६५, ७७०
मराठी - २८,०२०
हिंदी (एमसीव्हीसी) - ७९०

Web Title: The eleventh entrance process will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.