अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु

By admin | Published: July 11, 2017 04:50 PM2017-07-11T16:50:25+5:302017-07-11T17:32:33+5:30

अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी रात्री १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आली. मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले महाविद्यालयाची माहिती देण्यात आली होती.

The eleventh entry process started | अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी रात्री १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आली. मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले महाविद्यालयाची माहिती देण्यात आली होती. 
पहिल्या गुणवत्ता यादीत एकूण १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.  कला शाखेत १५ हजार ९१२, विज्ञान शाखेत ४७ हजार ४२७, वाणिज्य शाखेत ९२ हजार ८३ आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी १ हजार ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. 
कोट्यामध्ये ३२ हजार ४७७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. व्यवस्थापनासाठी १ हजार ५३१, इन हाऊससाठी ११ हजार २९९, अल्पसंख्याकमध्ये १९ हजार ५७४ आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी ७३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

Web Title: The eleventh entry process started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.