स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणासीठी एल्गार

By admin | Published: May 1, 2017 05:35 PM2017-05-01T17:35:39+5:302017-05-01T17:35:39+5:30

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला.

Elgar, with the help of independence Vidarbha | स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणासीठी एल्गार

स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणासीठी एल्गार

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 1 - वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रवाद्यांनीदेखील महाराष्ट्रदिनाचा जल्लोष केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही तुरळक घटना वगळता एकूणच १ मेचा दिवस शांततेत पार पडला.
 
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यासारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने वामनराव चटप, अ‍ॅड.अनिल किलोर, हरिभाऊ केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय कर्णिक, अ‍ॅड.मुकेश समर्थ, संदेश सिंगलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.  तर सकाळी साडेनऊच्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
 
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने
दरम्यान, काही विदर्भवाद्यांनी धरमपेठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ राज्य शासनाविरोधात निदर्शने केली. भाजपाने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत अवघ्या मिनिटाभरातच ७ ते ८ आंदोलकांना ताब्यात घेतले.
 
हिंसा करायची नाही : श्रीहरी अणे 
भाजपाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पालन केले नाही. त्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. ही दुर्दैवी बाब आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. विदर्भासाठी अशी हिंसा आम्हाला नको आहे. मात्र कुणी आमच्याविरोधात हिंसा केली तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागेल, या शब्दांत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
अ‍ॅड.अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगरातील ‘विष्णू की रसोई’ येथे सकाळच्या सुमारास वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. तसेच त्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत ‘विरा’तर्फे ‘रक्ताक्षरी’ या मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
देशात विदर्भाची निर्मिती करण्याची क्षमता केवळ एकाच नेत्यात आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यासमोर इतर कुठल्याही नेत्याला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा लढा पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच १० हजार विदर्भवादी आपल्या रक्ताने स्वाक्षरी केलेले पत्र त्यांना पाठवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबतच्या आश्वासनाची आठवण करुन देणार आहेत, असे अ‍ॅड.अणे यांनी यावेळी सांगितले.
 
‘रक्ताक्षरी’ मोहिमेला नागपुरातून प्रारंभ
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसंदर्भात ‘विरा’तर्फे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात येणाºया पत्रावर विदर्भवादी स्वत:च्या रक्ताचा अंगठा लावणार आहेत. काळा दिवस पाळत असताना अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी मेहाडिया चौकात आयोजित कार्यक्रमादरम्यान रक्ताने स्वाक्षरी या मोहिमेची सुरुवात केली.  विदर्भातून १० हजार विदर्भवादी रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन पंतप्रधानांना पाठविणार आहेत.
 

Web Title: Elgar, with the help of independence Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.