महाराष्ट्राची मान शरमेने खाली.!

By admin | Published: July 25, 2014 12:08 AM2014-07-25T00:08:24+5:302014-07-25T00:08:24+5:30

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आघ्य कृत्यामुळे महराष्ट्राची मान शरमेने खाली गेली.

Embarrassed Maharashtra! | महाराष्ट्राची मान शरमेने खाली.!

महाराष्ट्राची मान शरमेने खाली.!

Next
राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आघ्य कृत्यामुळे महराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. खासदारांना निकृष्ट प्रतीचे अन्न मिळत असल्याची तक्रार करत तेथील एका मुस्लिम कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचे निंदनीय कृत्य केले गेले. शिवसेना खासदाराच्या या कृत्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेची शिकवण देणा:या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
 
लोकप्रतिनिधीच जर असे वागले तर कसे होणार? हा विचार प्रत्येक सामान्यांच्या मनात आहे. लोकप्रतिनिधींनी चांगली वर्तणूक करुन सामान्यांपुढे आदर्श निर्माण करायचा की अशी पातळी सोडून वागायचे, हा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र सदनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल शासनाकडे तक्रार केली पाहिजे होती, संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणो गरजेचे होते. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या इतिहासातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. पण आता लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
- अरविंद इनामदार, निवृत्त पोलिस महासंचालक
 
शिवसेनेच्या खासदाराने केलेला हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु, महाराष्ट्राच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापनाबद्दल वारंवार तक्रारी करुन त्याकडे दुर्लक्ष होणो गंभीर आहे. कोणाशीही हातापायी, मारामारी करुन यावर तोडगा निघणार नाही, राग शांतपणोही व्यक्त होऊ शकतो. सदनाच्या ढिसाळ कारभारामुळे या खासदारांच्या रागाचा प्रक्षोभ झाला. मात्र ते टाळता आले असते.
- विजया वाड, साहित्यिक
 
सामान्य जनेतेने विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीची वर्तणूक अशी असेल तर त्याबाबत विचार होणो गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकाराचा निषेधच आहे
- दीपक पवार, प्राध्यापक
 
अत्यंत धक्कादायक प्रकार होता हा. आम्ही निवडून दिल्याने लोकसभेत गेलेले प्रतिनिधी अशाप्रकाराची वर्तणूक करतात ती बाब भयंकर आहे. महाराष्ट्रात असे हजारो लोक आहेत, ज्यांना दिवसाला दोन घास मिळत नाहीत, त्या सामान्य लोकांनी काय करायचे? 
- रत्नाकर मतकरी, साहित्यिक
 
मराठी खासदारांना महाराष्ट्र भवन सतत देत असलेल्या वाईट वागणुकीमुळे निर्माण झालेल्या संतापाचा महाराष्ट्र भवनात स्फोट झाला. खासदार राजन विचारे यांनी केलेले कृत्य हे मुद्दाम केलेले नाही. त्यांना जेवण चांगले मिळत नाही. या प्रश्नाला त्यांना वाचा फोडायची होती. जेवण देणा:यांचा रोजा तोडायचा नव्हता. शिवसेना कधीही भेदभाव करीत नाही. शिवसेनेतही मुस्लिम आहेत. मीडीयाकडून त्याला वेगळे वळण देऊन धर्माच्या राजकारणाचा रंग चढवला जातो आहे. त्याच्याशी मी सहमत नाही. विचारे यांचा उद्देश निर्मळ होता. त्यांच्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ नये. अन्यथा मूळ प्रश्न बाजूला पडेल.
- अजिंक्य बव्रे (बिर्ला महाविद्यालय कल्याण)
 
राजन विचारे यांच्याकडून जो काही प्रकार घडला आहे. त्याविषयीचे पूर्ण सत्य जाणून न घेता. त्याचा बाऊ केला जात आहे. नेते मंडळी त्याला राजकीय रंग देऊन त्यावर स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजत आहेत.  राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ केल्याने सगळा गोंधळ माजला आहे. मिडीयाने तारतम्य ठेऊन या घटनेच्या बातम्या द्याव्यात अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. ज्यातून कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. याचे भान ठेवले पाहिजे. 
- पूजा पाटील, बिर्ला महाविद्यालय कल्याण
 
धर्माचे स्वातंत्र्य भारतात जेवढय़ा प्रमाणात आहे. तेवढे ते जगात  कुठेही नाही. प्रत्येक धर्मियाला त्याचे सण, उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे. त्याचे भान ठेवण्याची गरज आहे. घडला प्रकार अत्यंत वाईट असला तरी त्याचे समर्थन ही करता येत नाही. या घटनेचे दूरगामी पडसाद उमटले जाणार नाहीत हे पहाणो तितकेच महत्त्वाचे आहे. 
- स्वप्नील सिंग, बिर्ला महाविद्यालय कल्याण
 
महाराष्ट्र सदनात ज्या खासदारांनी हे कृत्य केले त्यांना जर तो कर्मचारी मुस्लिम आहे हे माहितअसेल तर ही बाब चुकीची आहे. परंतु जर त्यांना हे याची माहिती नसेल तर मात्र हे प्रकरण जास्त वाढवण्याची गरज नाही. 
- हनिफ मिङर, ठाणो
 
हा प्रकार निषेधात्मक आहे. त्याचप्रमाणो रागाच्या उद्रेकामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणो हा प्रकार दुर्दैवीच आहे. लोकप्रतिनिधींनी व्यवस्थापनाविरुद्ध राग व्यक्त करताना आधी विचार करुन वागले पाहिजे.
- नागनाथ कोतापल्ले, साहित्यिक
 
महाराष्ट्र सदनातील घटना निंदनीय आहे. मुळात राजकीय पक्ष कोणताही असो. ते महत्वाचे नाही. त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी असे चुकीचे वागत असतील तर मग ते निषेधार्थ आहे. अशा घटनांमुळे जनमानसात चुकीचा संदेश जातो. त्यामुळे ही घटना निषेधार्थ आहे.
- सुमेरा अब्दुलअली, सामाजिक कार्यकत्र्या
 
घटना कोणतीही असो राजकीय नेत्यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडली की साहजिकच अशा घटना घडतात आणि त्या निंदनीयच असतात. त्यामुळे साहजिकच दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेचा निषेधच आहे.
- अभिजित देशपांडे, प्राध्यापक
 
हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या तरी खासदारांनी अशा पध्दतीने वागणो चुकीचे आहे. मुळातच हे खासदार काही गल्लीबोळातले नाहीत. ते निवडून दिल्लीत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने वागणो हे शोभणारे नाही म्हणून ही घटना निषेधार्थ आहे.
- नंदू माधव, अभिनेता
 
मुळात येथे प्रश्न हा देवाचा अथवा धर्माचा नाही. तर प्रश्न आहे तो माणसाचा. एखाद्याच्या तोंडात  ‘चपाती’ कोंबून भरणो हे घृणास्पद आहे. आणि लोकप्रतिनिधींनी तरी असे वागू नये. त्यामुळे या घटनेचा निषेध आहे.
- दीप्ती पन्हाळेकर, शिक्षिका
 
आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे; असे लोकच जर चुकीचे वागू लागले तर मग उपयोग काय? शहरांचे, राज्याचे प्रश्न सुटावेत म्हणून मतदारांनी नवनिर्वाचित खासदारांना निवडून दिले आहे. आणि त्यांच्याकडून अशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे या घटनेचा निषेध आहे.
- संतोष पुकळे, शिक्षक
 
भाजपा आणि शिवसेना सत्तेत आल्यापासून मुस्लिम, दलित समाजाविरोधातील घटनांमध्ये वाढ झाली आहे. एखाद्या कामगारासोबत खासदाराने असे वागणो निंदनीय आहे. त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो.
- फिरोज मिठीबोरवाला, 
सामाजिक कार्यकर्ता
 
हा प्रकार निंदनीय आहे. सदनातील व्यवस्थापनेच्या अभावाची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली जाणो अपेक्षित होते, त्यांनी जर दुर्लक्ष केले तर इतर संबंधित विभागाशी संपर्क करायला पाहिजे होता. मात्र अशाप्रकारे कायद्यापलिकडे जाऊन लोकप्रतिनिधींचे वागणो चुकीचे आहे. सामान्यांनी विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या गैरवागणुकीमुळे सामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास राहणार नाही.
- इला भाटे, अभिनेत्री
 
या प्रकारामुळे आधीच मलिन असलेली लोकप्रतिनिधींची प्रतिमा आणखीच खालावेल, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तरी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचे भान बाळगले पाहिजे.
- नम्रता गायकवाड, अभिनेत्री
 
कोणत्याही प्रकरणाला जात, धर्म आणि भाषेचे बंधन घालू नये. महाराष्ट्र सदन हे शासकीय असून त्यासंबंधी शासनाकडून योग्यरित्या तक्रारींचे निवारण होणो अपेक्षित आहे. परंतु, या घटनेकडे जात-धर्मापलिकडे जाऊन सदनातील व्यवस्थापनाविषयी पडताळणी होणो गरजेचे आहे.- अजित भुरे, दिग्दर्शक
 
‘आज हे बंद, उद्या ते बंद, आम्ही मुले-मुले, आमचा काय संबंध’
असं एक बालगीत पूर्वी होतं. आता ते विस्मृतीत गेलं. परंतु छोटय़ा-छोटय़ा कारणांवरून वाढणारे ताणतणाव, बंद, मोर्चे, आंदोलने, राडेबाजी या सगळ्या गदारोळात आजचा युवक कसा विचार करतो, याचा धांडोळा शिवसेनेच्या दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्तानं घेतला असता, त्याच बालगीताची आठवण अनेकांना झाली. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात शिवसेनेनं चांगल्या सुविधांसाठी आंदोलन करताना चक्क रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचा:याला जबरदस्तीनं चपाती खाऊ घातली. हा प्रकार ज्यांनी-ज्यांनी वृत्तवाहिन्यावर पाहिला, वर्तमानपत्रत वाचला; त्यांनी या कृत्याचा मनोमन निषेधही केला. एरवी महाविद्यालयीन युवकांना अशा राजकीय  घटनांविषयी फारशी उत्कंठा नसते. करणं त्यांचं विश्व आता फार विस्तारलंय आणि त्यात जातीधर्माला अजिबात थारा नाही.पण  ‘हे विश्वची माझं घर’ अशा संतवचनाला जागणारा महाराष्ट्र दिल्लीतील त्या घटनेमुळे शरमिंदा झाला. जगाच्या कल्याणासाठी जिथे ज्ञानदेवांनी पसायदान मागितले, त्याच भूमीतील शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला, अशा संतप्त प्रतिक्रिया सेलिब्रिटी, विचारवंतांपासून सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असा सल्लाही अनेकांनी दिला.
 
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र भवनात जे काही कृत्य केले. ते जाणूनबाजून केले नाही. त्यांना जेवण चांगले मिळाले नाही. जेवण चांगले मिळत नसल्याने दिल्ली दरबारी महाराष्ट्र भवनाची बदनामी होत आहे. शिवसेना जात पात व धर्म मानत नाही. ज्याला जेवण खाऊन बघ असे सांगितले. त्याच्या चेह:यावर अथवा कपाळावर तो मुस्लिम असल्याचे लिहिले नव्हते. या सगळ्य़ा प्रकरणाला प्रसार माध्यमांनी वेगळे वळण देऊन एका खळबळजनक बातमीचे स्वरूप दिले. हा प्रकार घडण्याच्या दोन दिवसापूर्वी जेवण व्यवस्थापकांची भेट विचारे यांनी मागितली होती. त्याने त्यात दिरंगाई केल्याने अखेर हे पाऊल खासदारांना उचलावे लागेल
- स्वप्नील वीटकर 
(मॉडेल कॉलेज, डोंबिवली)
 
महाराष्ट्र सदनात
नेमकं काय घडलं ?
4शिवसेनेचे 11 खासदार दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात गेले.
4महाराष्ट्रीय जेवण मिळाले नाही म्हणून ते थेट कॅन्टिनमध्ये घुसले.
4तिथे उपस्थित एका कर्मचा:याला जाब विचारला गेला.
4त्याचेवळी सेना खासदार राजन विचारे यांनी अर्शद जुबेर या 
    कर्मचा:याच्या तोंडात जबरदस्तीने चपाती कोंबली
4यानंतर आपण असे काहीच केले नाही, असा विचारे यांचा दावा
4मात्र, वृत्तवाहिन्यांवरून या घटनेचे फुटेज झळकताच खेद व्यक्त.

 

Web Title: Embarrassed Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.