राज्यावर अवकाळी संकट
By Admin | Published: December 13, 2014 01:13 AM2014-12-13T01:13:47+5:302014-12-13T01:13:47+5:30
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े
गारपिटीचा तडाखा : उत्तर महाराष्ट्रात द्राक्षबागा आडव्या, दक्षिणोत रब्बीला फटका
मुंबई : विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े खरीप हंगाम गेला असताना रब्बीच्या सुरुवातीलाच अवकाळीने झोडपून काढल्याने शेतकरी पुरता हताश झाला आह़े
नाशिक जिलत अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी सात तालुक्यांत 1क् हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मुसळधार पाऊस व गारपिटीने शुक्रवारी खान्देशातील काही भागाला विशेषत: धुळे जिलला झोडपून काढले. यामुळे द्राक्ष, डाळींब, कांदा पिकाचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगावसह जिलच्या काही भागात सायंकाळी ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर या पावसामुळे नंदूरबारच्या सारंगखेडा यात्रेत भाविकांची तारांबळ उडाली.
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात सलग दुस:या दिवशी शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ शिर्डी परिसरात गारपीट, तर अकोले तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी कोपरगाव शहरासह माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, शहाजापूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, मोर्विस, मायेगाव देवी परिसरात वादळी पाऊस झाला़
च्सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुस:या दिवशीही पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेला ऊस, स्ट्रॉबेरी, हरभरा आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आह़े दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी भागात अवकाळी पाऊस झाला. या भागात डाळिंब बागांवर या पावसाचा परिणाम होणार आहे.
च्रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहराला सलग दुस:या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े या पावसामुळे झालेल्या नुकसानीच माहिती सरकारी कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकली नाही़
द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान
सोलापूरमध्ये शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने काढणी झालेल्या कांद्याचा शेतातच रेंदा झाला तर बाजार समितीमध्ये आलेल्या कांदा भिजल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. तसेच द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आह़े सलग तीन दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान झाले आह़े
वादळ व गारांसह शिर्डीला झोडपले
गुरुवारी रात्री वादळ व गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने शिर्डीला झोडपले. पजर्न्यमापकानुसार शिर्डीला 47 मिमी़ पाऊस झाला़
सोलापुरात
कांदा भिजला
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 55क् ट्रक कांदा आला होता. कांद्याची मोठी आवक झाल्याने बराचसा कांदा उघडय़ावर होता. पहाटे पावसाला सुरुवात झाल्याने कांद्याच्या पिशव्या अक्षरश: भिजून गेल्या.