प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे निधन

By Admin | Published: August 26, 2016 10:59 AM2016-08-26T10:59:41+5:302016-08-26T12:23:14+5:30

प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

Eminent nominee Bhai Marathe dies | प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे निधन

प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.  आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आपल्या निवेदनाने गेली अनेक वर्ष मराठी रसिकांना मोहिनी घालणारे मराठे हे एशियन पेंट्समध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. दांडगं वाचन, विनोदी, उत्साही व उत्स्फूर्तपण निवदेन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना अनेक कवींच्या शेकडो कविता तोंडपाठ होत्या. त्यांनी निवेदनाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे केले. एखादा कार्यक्रम कसा रंगवायचा, मैफील कसे फुलवायचे याची त्यांना अचूक जाण होती. आजही अनेक तरूणांचे ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सांस्कृतिक जगतातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Eminent nominee Bhai Marathe dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.