जावे ‘इमोजीं’च्या ग्लोबल देशा !

By admin | Published: July 19, 2016 03:43 AM2016-07-19T03:43:27+5:302016-07-19T03:43:27+5:30

फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो.

Emoji's Global Country! | जावे ‘इमोजीं’च्या ग्लोबल देशा !

जावे ‘इमोजीं’च्या ग्लोबल देशा !

Next

स्नेहा मोरे,

मुंबई- ‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे. १७ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड इमोजी डे’ म्हणून सेलीब्रेट होतो आहे. याच निमित्ताने या इमोजींच्या विश्वाचा ग्लोबल पसारा दिवसागणिक विस्तारतोय याचीच प्रचिती येते.
शब्दांपेक्षा आपण या इमोजींना आपलेसे का केले, यामागचे उत्तर नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. इमोजींच्या वापराविषयी १ जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीचा अभ्यास करण्यात आला. नुकत्याच या इमोजींबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘जॉय’ ही इमोजी देशभरात सगळ्यात जास्त शेअर करण्यात आली आहे.
‘टिष्ट्वटर’ने तर खासकरून या दिनानिमित्त हा दिवस ‘फुल्ल’ इमोजी स्पेशल करायचा ठरवला आहे. त्यासाठी खास स्पेशल इमोजी डिझाइन केले असून ‘#वर्ल्ड इमोजी डे’ या हॅशटॅगने शेअर केला जाणार आहे. शिवाय, एक गमतीची गोष्ट म्हणजे ‘कॉफी’च्या इमोजीपेक्षा ‘बिअर’ची इमोजी युजर्सने सगळ्यात जास्त शेअर केली आहे आणि ‘हार्टब्रेक’च्या इमोजीपेक्षा ‘फुलहार्ट’ची इमोजीही टिष्ट्वटरवर हिट ठरली आहे.
युनिक इमोजी वापरण्यात भारत काहीसा ‘फ्रंटफूट’वर आहे. युनिक इमोजीमध्ये ‘नमस्ते’, ‘परफेक्ट’ आणि ‘थम्ब्स अप’ यांचे शेअरिंग सर्वाधिक झाले आहे. तर देशाच्या कॅनव्हासवर सगळ्यात जास्त वापर होणाऱ्या टॉप टेन्स इमोजीमध्ये ‘जॉय’, ‘हार्ट आयस्’, ‘नमस्ते’, ‘क्लॅप’, ‘किसिंग हार्ट्स’, ‘परफेक्ट’, ‘ब्लश’, ‘थम्ब्स अप’, ‘डान्सर’ आणि ‘फायर’ यांनी स्थान मिळवले आहे.
‘क्रायिंग विथ लाफ्टर’ इमोजी हिट!
२०१५ साली खऱ्या अर्थाने इमोजी मेनस्ट्रीममध्ये आल्या. गेल्या वर्षभरात इमोजींचा वापर वाढतो आहे. यातच गेल्या वर्षी टिष्ट्वटरवर ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ ही इमोजी ६.६
बिलिअन्स युजर्सने वापरली होती. त्यानंतर ‘हार्ट आयस्’चा सर्वाधिक वापर झाला
होता.

Web Title: Emoji's Global Country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.