मराठी माणसाच्या मनगटातील जोर दाखवून दिला - उद्धव ठाकरे

By admin | Published: March 8, 2017 08:02 PM2017-03-08T20:02:41+5:302017-03-08T20:03:48+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत उपस्थित राहत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं अभिनंदन केलं

The emphasis of Marathi man's wrist - Uddhav Thackeray | मराठी माणसाच्या मनगटातील जोर दाखवून दिला - उद्धव ठाकरे

मराठी माणसाच्या मनगटातील जोर दाखवून दिला - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला असून विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत उपस्थित राहत विश्वनाथ महाडेश्वर यांचं अभिनंदन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे आभार मानत शिवसेनेवरील ही निष्ठा, शिवसेनेची ही ताकद, अशीच कायम ठेवा असं आवाहन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यानंतर शिवसेनेनं महापालिका ते हुतात्मा स्मारक शक्तिप्रदर्शनदेखील केलं. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि ठाकरे कुटुंबियांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केलं.
 
'मराठी माणसाच्या मनगटात किती जोर आहे, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. मुंबईकरांनी सलग पाचव्यांदा आपली सेवा करण्याची आपल्याला दिली आहे. शिवसेनेवरील ही निष्ठा, शिवसेनेची ही ताकद, अशीच कायम ठेवा', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुंबई महापालिकेवर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालीय. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे 76व्या महापौर ठरले आहेत. हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत. महाडेश्वर यांच्या बाजूनं शिवसेना 84, भाजपा 83 आणि अपक्ष 4 अशा एकूण 171 नगरसेवकांनी मतदान केलं आहे. अपक्ष उमेदवार मुमताझ खान यांनी सेनेला पाठिंबा दिला नाही. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 31 मते मिळाली आहेत.
 
महापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत. मनसेच्या नगरसेवकांनी यावेळी अनुपस्थित राहणं पसंत केलं आहे. पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक आपापल्या कार्यालयातच बसून होते. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही, याबाबत पक्ष प्रमुखांकडून स्पष्ट सूचना न मिळाल्यानं मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात येणे टाळले.
 
शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला . मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशे वाजवून वाजतगाजत मिरवणुका काढल्या. शिवसेनेनं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. 
 

Web Title: The emphasis of Marathi man's wrist - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.