राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:00 AM2019-01-01T03:00:15+5:302019-01-01T03:00:57+5:30

विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे.

 Employees from all municipal corporations in the state today strike | राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Next

मुंबई : राज्यातील ३५९ नगरपालिका, तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षाची सुरुवातच बेमुदत संपापासून केली आहे. रोजंदारी कर्मचा-यांसह ग्रामपंचायत कर्मचा-यांचे समावेशन आणि सातव्या वेतन आयोगासारख्या विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अत्यावश्यक सेवांचाही समावेश केल्याची माहिती संघर्ष समितीचे नेते विश्वनाथ घुगे यांनी दिली.
घुगे यांनी सांगितले की, नगर परिषद, तसेच नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाºयांना १ जानेवारी, २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी २५ आॅगस्ट, २०१७च्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार नगर परिषदेमधील १० मार्च, १९९३ पूर्वीचे, तसेच २००० पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचाºयांना ३१ डिसेंबर, २०१८ पूर्वी कायम करावे, अशा विविध मागण्यांवर सरकारने तोंडी व लेखी आश्वासने दिली होती. मात्र, त्यानंतरही शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याने, संघर्ष समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले होते. त्यात १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीबाहेर कामगारांनी राज्यव्यापी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधले होते.
याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यानंतर पुन्हा संघर्ष समितीने
२९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करत शासनाला मागण्यांची आठवण करून दिली. या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता, तरीही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास १ जानेवारीपासून बेमुदत संप करणार असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले.

आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणी

संपामुळे पाणीपुरवठा, साफसफाई तसेच अन्य सेवांवर परिणाम होणार असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. मात्र, कोणत्याही नव्या मागणीसाठी हा संप कर्मचारी करत नसून, शासनानेच दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची संघर्ष समितीची मागणी आहे. वारंवार इशारा दिल्यानंतरही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी केली नसल्याने संघर्ष समितीने नाइलाजास्तव अत्यावश्यक सेवांसह सर्व सेवा-सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले.

Web Title:  Employees from all municipal corporations in the state today strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप