कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच पगार

By admin | Published: October 21, 2016 04:58 AM2016-10-21T04:58:52+5:302016-10-21T04:58:52+5:30

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने सरकारने सुखद धक्का दिला असून नोव्हेंबर महिन्यात होणारे वेतन २५ आॅक्टोबर रोजीच देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय

Employees pay for Diwali before Diwali | कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच पगार

कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच पगार

Next

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने सरकारने सुखद धक्का दिला असून नोव्हेंबर महिन्यात होणारे वेतन २५ आॅक्टोबर रोजीच देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निवृत्तीवेतन धारकांंनाही लागू असेल.
यावर्षी दिवाळी २८ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत येत आहे. त्यामुळे हा निर्णय वित्त विभागाने घेतला असून आॅक्टोबर महिन्याचा पगार २५ आॅक्टोबरपूर्वीच दिला देण्यासाठी कोषागार नियम १९६८ च्या नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी शिथील करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ आॅक्टोबर महिन्याचा पगारच नव्हे तर प्रवास भत्ते आणि या महिन्याची अन्य बिले देखील त्याच महिन्यात देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. हा निर्णय राज्यातील जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणीक संस्था, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, व त्यांच्या संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांनाही लागू असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Employees pay for Diwali before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.