‘आमदारांची वेतनवाढ योग्यच’ - सुधीर मुनगंटीवार
By admin | Published: August 11, 2016 04:35 AM2016-08-11T04:35:10+5:302016-08-11T04:35:10+5:30
विधानसभा सदस्यांना वाढीव दिलेली वेतनवाढ ही योग्यच आहे. ही वाढ याअगोदर अनेक राज्यांनी केली असून, याची अंमलबजावणी अद्याप केली नाही
पंढरपूर : विधानसभा सदस्यांना वाढीव दिलेली वेतनवाढ ही योग्यच आहे. ही वाढ याअगोदर अनेक राज्यांनी केली असून, याची अंमलबजावणी अद्याप केली नाही; मात्र याबाबत समाजामध्ये सरकारविषयी चुकीचा संदेश पसरविला जात असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बुधवारी सहकुटुंब ते दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. राज्यातील अनेक विनाअनुदानित शिक्षकांना वेतन न मिळाल्यामुळे शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांच्यासह अन्य दोन आमदारांनी वेतनवाढ घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, घटनेनुसार असे करता येते का याची माहिती घेऊन मी बोलेन; मात्र आमदारांच्या वेतनवाढीमुळे हजारो कोटींचा भार राज्याच्या तिजोरीवर पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीअगोदर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये टाकू, त्याबद्दल विचारले असता , ‘‘कायदा आपले काम करीत असतो. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कारवाईही होते. यावेळी पक्ष महत्त्वाचा नसतो; मात्र राजकीय विरोधकांशी सुडबुद्धीने वागणे चुकीचे आहे.