रोजगार विभाग झाला कौशल्य विकास-उद्योजकता विभाग

By admin | Published: July 20, 2015 11:01 PM2015-07-20T23:01:18+5:302015-07-20T23:01:18+5:30

जिल्हा रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे नामकरण.

Employment Department Department of Skill Development-Entrepreneurship Department | रोजगार विभाग झाला कौशल्य विकास-उद्योजकता विभाग

रोजगार विभाग झाला कौशल्य विकास-उद्योजकता विभाग

Next

संतोष येलकर/अकोला: शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलैपासून राज्यातील विभागीय आणि जिल्हास्तरावरील रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे ह्यकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रह्णअसे नामकरण करण्यात आले आहे. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाचे रूपांतर करून, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हा विभाग निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला होता. यासंदर्भात शासनाच्या १ जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागांतर्गत राज्यातील विभागस्तर आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांचे नामकरण १५ जुलैपासून करण्यात आले आहे. *कुशल मनुष्यबळासाठी ताळमेळाचे काम! कौशल्य विकासासाठी जिल्हय़ातील कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा याबाबतचा ताळमेळ लावण्याचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत कौशल्य विकासाकरिता राबविण्यात येणार्‍या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी तसेच राज्य कौशल्य विकास संस्थेच्या पोर्टलवर लाभार्थी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार्‍या जिल्हय़ातील संस्था, विविध विषयांच्या तज्ज्ञांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.ऑनलाईन नोंदणीनंतर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची तपासणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रांमार्फत करण्यात येणार आहे.

Web Title: Employment Department Department of Skill Development-Entrepreneurship Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.