राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार -  नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:06 PM2021-08-05T18:06:55+5:302021-08-05T18:08:08+5:30

Employment : बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.

Employment to more than 15,000 unemployed in the state in July - Nawab Malik claims | राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार -  नवाब मलिक

राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार -  नवाब मलिक

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे देशभरात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै 2021 मध्ये 15 हजार 320 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तसेच, महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. (Employment to more than 15,000 unemployed in the state in July - Nawab Malik claims)

अशा विविध उपक्रमांमधून 2020 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जुलैअखेर 93 हजार 711 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. विभागाकडे महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 90 हजार 735 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

याबरोबर, जुलै 2021 मध्ये विभागाकडे 48 हजार 995 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात 11 हजार 619, नाशिक विभागात 7 हजार 554, पुणे विभागात 15 हजार 647, औरंगाबाद विभागात 7 हजार 247, अमरावती विभागात 3 हजार 46 तर नागपूर विभागात 3 हजार 882 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. तर माहे जुलैमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 15 हजार 320 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 5 हजार 412, नाशिक विभागात 2 हजार 437, पुणे विभागात सर्वाधिक 6 हजार 953, औरंगाबाद विभागात 274, अमरावती विभागात 115 तर नागपूर विभागात 129 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीला लागल्याचा दावा नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक 
दरम्यान, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. तसेच, कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

Web Title: Employment to more than 15,000 unemployed in the state in July - Nawab Malik claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.