राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:00 PM2020-01-03T23:00:00+5:302020-01-03T23:00:02+5:30

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला ?

Employment in sugar factories in the state is prohibited | राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय

- प्रशांत ननवरे-
बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चित करण्यात येणार आहे.हा आकृतीबंध निश्चित  होवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू नये,असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.
        जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत.मात्र,याच दरम्यान राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तोंडावर आलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी,कर्मचारी यांचा आकृतिबंध कसा असावा, याबाबत साखर आयुक्तांनी साखरसंचालकांच्या   अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच, समितीने सादरकेलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध निश्चित करण्याचे कामप्रगतीपथावर आहे.
राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. उसउत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी ची रक्कम वेळेत देणेही अडचणीचे ठरत आहे.काही कारखान्याच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे.या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चितहोवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये.
 साखर आयुक्तांनी याबाबत हे आदेश साखर कारखान्याच्या निदर्शनास आणावेत,त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश सहकारविभागाचे सचिव प्रमोद वळंज यांनी दिले आहेत.या निर्णयाबाबत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ''लोकमत' शी  बोलताना सांगितले की,  राज्यातील साखर कारखान्यांनीआकृतीबंधाप्रमाणेच नोकरभरती करणे आवश्यक आहे. कामगारांना पगारवाढ दिलीजाते, दरवर्षी ८.३३ टक्के बोनस दिला जातो. ते देण्याबाबत दुमत नाही. पगारवाढ आणि बोनस कामगारांना मिळालाच पाहिजे.तो त्यांचा हक्क आहे.मात्र, अनावश्यक भरती करु नये. शेतकरी आणि कामगार एकाच रथाची दोनचाके आहेत. दोन्ही समाधानी राहणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखान्याचामालक असणारा ऊस उत्पादक सभासद बाजुला टाकला जावु नये,याची दक्षता घेण्याचीगरज जाचक यांनी व्यक्त केली.
———————————————

Web Title: Employment in sugar factories in the state is prohibited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.