‘रामगिरी’बाहेर कर्मचारी करणार बेमुदत उपोषण

By admin | Published: September 21, 2016 05:37 AM2016-09-21T05:37:22+5:302016-09-21T05:37:22+5:30

महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला

Empty fasting to employees outside Ramagiri | ‘रामगिरी’बाहेर कर्मचारी करणार बेमुदत उपोषण

‘रामगिरी’बाहेर कर्मचारी करणार बेमुदत उपोषण

Next


मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गांधीगिरीच्या मार्गाने बुधवारी, २१ सप्टेंबरपासून संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील ‘रामगिरी’ बंगल्याबाहेर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरती विनाअट करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वारसाहक्क पूर्वीप्रमाणे चालू ठेवावा, सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा अशा संघटनेच्या मागण्या आहेत. दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत, मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त केली. मात्र, या समितीची बैठक झालेली नाही. बेमुदत उपोषणातून कर्मचारी रोष व्यक्त करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Empty fasting to employees outside Ramagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.