पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:04 PM2022-12-15T12:04:00+5:302022-12-15T12:04:18+5:30

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती.

Encroachment by Gujarat on Palghar border; In the inspection of the district collector, the citizens expressed their grief | पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : गुजरात राज्यातील यंत्रणा जाणीवपूर्वक पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व झाई गावांमध्ये अतिक्रमण करीत आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत विद्युत खांब टाकत आहे. दोन राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या नागरिकांची अडवणूक करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केलेल्या या गावांच्या पाहणीवेळी नागरिकांनी केली.

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती. त्यामुळे वेवजी व झाई येथे भूमापन करून सीमा निश्चित करण्याची मागणी वेवजी गावचे नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. गुजरात राज्याची यंत्रणा त्याला विरोध करीत असून, महाराष्ट्रातील अधिकारीही डोळ्यावर झापड ओढून बसले आहेत, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पालघरचे  जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी बुधवारी दुपारी तलासरी तालुक्यातील वेवजी व झाई  या सीमावर्ती गावांना भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

महाराष्ट्र - गुजरात राज्यात विभाजन   
अगोदर उंबरगाव तालुका होता. विभाजनानंतर तलासरी तालुका निर्माण करून उंबरगाव गुजरातमध्ये गेले. ज्येष्ठ नागरिकांच्या मतानुसार रेल्वे लाइनच्या पलीकडे गुजरात व अलीकडे महाराष्ट्र होते. तसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्तंभही होते. बांधकाम खाते रेल्वे लाइनपर्यंत रस्तेही बनवत होते. पण, कालांतराने गुजरातने एक किमीपर्यंत आपली हद्द दाखवून तेथे वसाहती निर्माण केल्या.

दादागिरी थांबवा
वेवजीचे उपसरपंच अनंता खुलात तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बबला धोडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सीमा निश्चितीची मागणी केली.

Web Title: Encroachment by Gujarat on Palghar border; In the inspection of the district collector, the citizens expressed their grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.