डिसेंबर अखेर राज्यातील एसटी स्थानके कचरामुक्त, ४४६ कोटींचे कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:15 AM2017-10-03T04:15:08+5:302017-10-03T04:15:14+5:30
राज्य मार्ग परिहवन महामंडळाचा संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा सुरु करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व एसटी स्थानके कचरामुक्त होतील
मुंबई :राज्य मार्ग परिहवन महामंडळाचा संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा सुरु करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व एसटी स्थानके कचरामुक्त होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी व्यक्त केला. सोमवारी कुर्ला-नेहरु नगर येथे झालेल्या प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात दिवाकर रावते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई , आदित्य ठाकरे उपस्थित होते.
या प्रकल्पातंर्गत राज्यातील सर्व बसस्थानकांसह, आगार, चालक-वाहक विश्रांतीगृह स्वच्छ करण्यात येईल. कुर्ला नेहरुनगर सह राज्यातही एकाचवेळी याची सुरूवात झाल्याचे रावते यांनी सांगितले. प्रदूषण मुक्त एसटी चालवण्यासाठी हायब्रिड आणि इथेनॉलवरील एसटीचा समावेश करता येईल का ? याबाबत विचार करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.