निवडणुकीच्या वर्षात अखेर शालेय वस्तू ऑन टाईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 08:37 PM2016-12-29T20:37:36+5:302016-12-29T20:37:36+5:30

स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे.

At the end of the election year, school objects on-time | निवडणुकीच्या वर्षात अखेर शालेय वस्तू ऑन टाईम

निवडणुकीच्या वर्षात अखेर शालेय वस्तू ऑन टाईम

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 -विकास कामांचे प्रस्ताव घाईघाईने स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे. महापालिकेलच्या आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी बेस्ट ठरण्यासाठी पालिका शाळांमध्ये २७ शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल, असा दावा शिवसेनेने केला आहे.

महापालिका शाळांमधील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य देण्यात येतात. मात्र आतापर्यंत अनेक वेळा या वस्तूंना लेटमार्कच लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असे. रेनकोट पावसाळ्यानंतर तर पुस्तक परीक्षेनंतर मिळत असल्याने हे साहित्य देण्याचे उद्दिष्ट निष्फळ ठरत होते. परंतु पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटाच पालिकेनं लावला आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तब्बल १०१५४ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

दोन आठवड्यात तब्बल २६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवल्यास पुढच्या शैक्षणिक वर्षात पुन्हा विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरा मिळतील, अशी भीती दाखवण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच शालेय वस्तू खरेदीचे प्रस्ताव मंजूर करून शैक्षणिक साहित्य शाळांना मिळण्यापूर्वीच शिवसेनेने आपली पाठ थोपटून घेतली आहे.

असे आहेत शालेय साहित्य

पहिली ते दहावीच्या विदयार्थ्यांसाठी गणवेश तसेच बूट आणि मोजे यांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच कंपास पेटी, प्लास्टिक पट़टी,कलर्स, ड्राईग पेन्सिल, ब्रश,रायटिंगपेन्सिल,खोडरबर,प्लॅ॑स्टिक बॉक्स, बॉलपेन बॉक्स अशाप्रकारे १५ शालेय वस्तू, शालेय दप्तर,पाण्याची बाटली, खाऊचा डबा असा दप्तर संच, वह्यांचे संच तसेच रेनकोट व छत्री आदी शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
पुढील दोन वर्षांसाठी हया शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत आहे. यासर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यामुळे जानेवारी महिन्यात याचे कार्यादेश देऊन हे सर्वसाहित्य एप्रिल -मे महिन्यापर्यंत प्रत्येक शाळांना उपलब्ध करून दिले जाईल.त्यानुसार सर्व शालेय साहित्याचे वाटप विदयार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच केले जाईल, असा पालिकेचा दावा आहे

१४३ विज्ञान प्रयोगशाळा
विदयार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक, वैज्ञानिक उपकरणांची ओळख होणे, वैज्ञानिक साहित्य हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी २०१६-१७ मध्ये महापालिकेच्या १०२ प्राथमिक व ४१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हे साहित्य विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Web Title: At the end of the election year, school objects on-time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.