१५ जूनपर्यंत तूर खरेदीला सरकारची मुदतवाढ!
By admin | Published: June 2, 2017 03:49 AM2017-06-02T03:49:00+5:302017-06-02T03:49:00+5:30
राज्यात तूर खरेदीला १५ जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली असून ती मान्य होईल, असा विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात तूर खरेदीला १५ जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली असून ती मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की, तुरीची एकूण खरेदी सहा लाख क्विंटलपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करून त्याची विक्री बाजार समित्यांच्या बाहेरही करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. कडधान्ये, डाळींबाबतही असा निर्णय विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शेतमालाला सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव देता येणार नाही, असा कायदाच आपले सरकार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.