माण तालुक्याचे टंचार्ईचे दुष्टचक्र संपेना

By admin | Published: April 13, 2015 05:09 AM2015-04-13T05:09:26+5:302015-04-13T11:39:09+5:30

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता

To end Maa taluka's trench wall | माण तालुक्याचे टंचार्ईचे दुष्टचक्र संपेना

माण तालुक्याचे टंचार्ईचे दुष्टचक्र संपेना

Next

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १६ टँकर सुरू करण्यात आले आहेत. सर्वाधिक पाणीटंचाई माण तालुक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. माणमध्ये ८, खटाव २, कोरेगाव १, फलटण १, वाई तालुक्यात ४ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी भूजल पातळी वाढली होती़ यंदा ती जवळपास ५ मीटरने खालावली आहे़ परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत़
सांगलीत केवळ ३३ टक्के साठा
सांगली : गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठाही बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सुमारे ३३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी ४ टक्के पाणीसाठा वाढला आहे. या सप्ताहात या वर्षातील पहिला टँकर जत तालुक्यातील उमराणी या गावी सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सांगली जिल्ह्यात ८३ लघू व मध्यम प्रकल्प आहेत. यामधील एकही भरला नसला तरी, यामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २९ टक्के साठा होता. २०१२-१३मध्ये सांगली जिल्ह्यात ६२ टँकरने पाणीपुरवठा सुुरू होता. गतवर्षी ९ टँकर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होते. या वर्षी मात्र एकच टँकर सुरू आहे. मे अखेरपर्यंत २० टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: To end Maa taluka's trench wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.