बँकासह एटीएमच्या रांगेचा मनस्ताप संपेना

By admin | Published: November 13, 2016 02:37 AM2016-11-13T02:37:28+5:302016-11-13T02:37:28+5:30

पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लागलेल्या रांगांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. तर एटीएमबाहेरही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तासनतास

Ending the hassle of the ATM queue with banks | बँकासह एटीएमच्या रांगेचा मनस्ताप संपेना

बँकासह एटीएमच्या रांगेचा मनस्ताप संपेना

Next

मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लागलेल्या रांगांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. तर एटीएमबाहेरही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. वीकेण्डमुळे यात आणखी भर पडली असून, मंगळवारच्या रात्रीपासून सुरु झालेला हा मनस्ताप पुढील आठवडाभर तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. शिवाय सुट्टयांपैशाभावी सुरु झालेला गोंधळ वाढला असून, चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठीचा मनस्ताप दिवसेंदिवस वाढतच आहे.
मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी बँक आणि एटीएम बंद होते. गुरुवारी बँकाचे व्यवहार सुरु झाले. तर शुक्रवारी एटीएम सेवा कार्यान्वित झाली.
मात्र बँकातून नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. हीच परिस्थिती एटीएमची होती. गुरुवार, शुक्रवारनंतर शनिवारी काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी आशा मुंबईकरांना होती.
प्रत्यक्षात मात्र शनिवारचा दिवसही मनस्तापानेच उजाडला. शनिवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक, सारस्वत बँक, अभ्युदय बँकांसमोर भल्यामोठया रांगा लागल्या होत्या.
शिवाय टपाल कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांनी रांग लावली होती. बँकासमोरील रांगांमुळे पैसे बदलून मिळण्यास चार ते सहा तासांहून अधिक काळ लागत होता. शिवाय एटीएममधूनही दोन हजारांच्या नोटा येत असल्याने त्या प्रत्यक्ष व्यवहारात आणताना मुंबईकरांच्या नाकी नऊ आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ending the hassle of the ATM queue with banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.