लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा- अण्णा हजारे

By admin | Published: July 24, 2016 08:25 PM2016-07-24T20:25:12+5:302016-07-24T20:25:12+5:30

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही, पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़

Enforce Lokpal Act - Anna Hazare | लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा- अण्णा हजारे

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा- अण्णा हजारे

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24 - शासनाने लोकपाल कायदा मंजूर केला पण, त्याची अंमलबजावणी मात्र अजून केली नाही़ ते बघू, पाहू असे म्हणताहेत. त्यांनी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही, पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़
पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनासाठी ते आले असताना पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, लोकपाल कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप पाहिजे त्याप्रमाणात होताना दिसत नाही़ या संदर्भात शासनाला आपण पत्र लिहिले आहे़ त्यांचे उत्तर पाहू, करु असे आहे़ शेवटी संघर्षाला पर्याय नाही़. 
एकनाथ खडसे यांच्या एमआयडीसीतील जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, एका व्यक्तीची चौकशी समिती नेमून उपयोग नाही़ चौकशी आयोग नेमला पाहिजे़ चौकशी आयोगाला कायद्याचा आधार असतो़. 
कोपर्डी घटनेविषयी ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. दारू, नशाबाजी यातून असे अमानुष प्रकार घडतात़ त्यासाठी आम्ही ग्रामसुरक्षा दल कायद्याची मागणी केली आहे़ त्यात गावातील महिलांचाही समावेश आहे़ या दलाला अधिकार नसेल, पण गावात अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती ते पोलिसांना देतील, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागेल़ कारवाई केली नाही तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहिल़ त्यातून दारू व अन्य अवैध बाबींना आळा बसू शकतो़ असा कायदा करावा, यासाठी आम्ही शासनाला पत्र दिले आहे.

Web Title: Enforce Lokpal Act - Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.