शिवसेनेला धक्के पे धक्का! अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:22 PM2022-06-24T17:22:25+5:302022-06-24T17:23:26+5:30

ईडीच्या कारवाईनंतर आता गुवाहाटीला जाणार का, यावर अर्जुन खोतकर यांनी सूचक विधान केले आहे.

enforcement directorate ed seizes shiv sena leader arjun khotkar 200 acre factory land in jalna | शिवसेनेला धक्के पे धक्का! अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त

शिवसेनेला धक्के पे धक्का! अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई; कारखान्याची २०० एकर जमीन जप्त

googlenewsNext

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिवसेनेला एकावर एक धक्के बसत आहेत. एकाबाजूला शिंदे गटाचे मोठे बंड, दुसऱ्या बाजूला अनिल परब यांची ईडीकडून सलग चौकशी सुरू असताना, यात भर म्हणून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामध्ये कारखान्याची २०० एकर जमीन आणि यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यानंतर आता या कारखान्याच्या जमिनीच्या जप्तीचा निर्णय ईडीकडून घेण्यात आला आहे. यामध्ये कारखान्याची इमारत, संबधित जमीन आणि त्यातील यंत्रसामग्री या सर्वांचा समावेश आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अर्जुन खोतकर संचालक असलेला हा कारखाना

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे या कारखान्याच्या संचालक मंडळावर असल्याचे सांगितले जात आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार नातेवाइक आणि इतरांच्या सहकार्याने चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. कारखान्यावर धाड टाकताना याच्या खरेदी सहभागी असलेले औरंगाबादचे एक बिल्डर तसेच मालक यांच्या संबंधित ठिकाणीही ईडीने छापेमारी केली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी ही पहिलीच कारवाई असून, अर्जुन खोतकर यांच्यासह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

ईडीच्या कारवाईनंतर गुवाहाटीला जाणार का?

ईडीच्या कारवाईच्या वृत्तानंतर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया समोर आली. ईडीने कारखान्यावर नेमकी काय कारवाई केली माहिती नाही. मुंबईहून नाशिकला जात असताना मला ही माहिती मिळाली. अनेकांचे याबाबतीत फोन येत आहेत. तिथे गेल्यावर नेमकी माहिती मिळू शकेल. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. काय ती कायदेशीर लढाई लढू, असे खोतकर म्हणाले. यावेळी ईडीच्या कारवाईनंतर आता गुवाहाटीला जाणार का, असा प्रश्न अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आला, त्यावर बोलताना, काय बोलता तुम्ही. असे काहीच होणार नाही, असे खोतकर म्हणाले. 
 

Read in English

Web Title: enforcement directorate ed seizes shiv sena leader arjun khotkar 200 acre factory land in jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.