INS विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू

By admin | Published: March 7, 2016 07:41 AM2016-03-07T07:41:07+5:302016-03-07T11:07:07+5:30

भारतीय नौदलाच्या आयएनएस विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे

An engineer dies in a fire in INS Viraat | INS विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू

INS विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ७ - भारतीय नौदलाच्या आयएनएस विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. 
 
आयएनस विराट सध्या गोव्याच्या समुद्रकिना-यात तैनात आहे. दुपारच्या सुमारास बॉयलर रुममधून वाफेची गळती झाल्यामुळे ही आग लागली. आगीवर तात्काळ नियंत्रण आणण्यात आलं मात्र धुरामुळे उपस्थित 4 खलाशांचा श्वास गुदमरला असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. 
 
जखमी खलाशांपैकी चीफ इंजिनिअरिंग मेकॅनिक आशु सिंग यांना गोव्यातील नौदलाच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. इतर 3 खलाशांवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. आयएनस विराट यावर्षी सेवेतून निवृत्त होतं आहे. 
 

Web Title: An engineer dies in a fire in INS Viraat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.