पनवेलमध्ये अभियंत्यास लाच घेताना अटक

By Admin | Published: November 1, 2014 01:30 AM2014-11-01T01:30:32+5:302014-11-01T01:30:32+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता भुधेश पुंडलिक रंगारी याला 73 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Engineer in Panvel arrested while taking bribe | पनवेलमध्ये अभियंत्यास लाच घेताना अटक

पनवेलमध्ये अभियंत्यास लाच घेताना अटक

googlenewsNext
73 हजारांची घेतली लाच : घरामध्ये सापडले तब्बल 1 कोटी 28 लाख रुपये
नवी मुंबई, अलिबाग : सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता भुधेश पुंडलिक रंगारी याला 73 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. त्याच्या घरामध्ये तब्बल 1 कोटी 28 लाख 65 हजार 5क्क् रुपयांची रोकड सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका:यांनी गुन्हा दाखल करून त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन पनवेलमधील भिंगारी कार्यालयात भुधेश रंगारी कार्यरत आहे. त्याच्या कार्यक्षेत्रतील पनवेल शासकीय विश्रमगृह येथील इमारतीच्या शेडची दुरुस्ती व महिला विश्रमगृह बांधलेल्या ठेकेदाराचे 3 लाख 77 हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. ते मंजूर करण्यासाठी 2क् टक्केप्रमाणो 73 हजार रुपयांची लाच रंगारीने मागितली होती. पैशासाठी तगादा लावत असल्यामुळे सदर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे अधिका:यांनी 31 ऑक्टोबरला सापळा रचला. रंगारी याने  ठेकेदारास पैसे घेऊन भिंगारी कार्यालयात बोलावले. या ठिकाणी 73 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. 
लाचलुचपत विभागाच्या अधिका:यांनी या प्रकरणी रंगारीच्या खारघरमधील घराची झडती घेतली. या वेळी तब्बल 1 कोटी 28 लाख 65 हजार 5क्क् रुपयांची रोकड आढळून आली. याशिवाय त्याच्या ब्रिफकेसमध्येही 1 लाख 15 हजार रुपये सापडले आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली. 
तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त रोकड सापडल्यामुळे रंगारी याच्याकडे अजून मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरार्पयत पोलीस त्याच्या संपत्तीविषयी माहिती घेत होते. शनिवारी त्याच्या लॉकरची तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये अजून किती संपत्ती सापडते याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 
दरम्यान, या घटनेमुळे पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली 
आहे. (प्रतिनिधी)
 
आणखी घबाड सापडण्याची शक्यता
कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या रंगारीच्या घरामध्ये एक कोटीपेक्षा जास्त रोकड सापडल्यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्याच्याकडे अजून कोटय़वधी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडण्याची शक्यता वर्तविली जात असून त्याच्या लॉकरमध्ये काय सापडणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
च्तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त रोकड सापडल्यामुळे रंगारी याच्याकडे अजून मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी 
मालमत्ता असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरार्पयत पोलीस त्याच्या संपत्तीविषयी माहिती 
घेत होते. शनिवारी त्याच्या लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे.

 

Web Title: Engineer in Panvel arrested while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.