इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:50 AM2018-09-16T02:50:49+5:302018-09-16T02:51:23+5:30
बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते
- सीमा महांगडे
मुंबई : राज्यात इंजिनिअरिंगच्या ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून आॅल इंडिया सर्व्हे आॅफ हायर एज्युकेशनच्या सर्वेक्षणानुसार, इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी ही विद्यार्थ्यांची पसंती असलेली देशातील तिसºया क्रमांकाची शाखा असल्याचे समोर आले आहे.
बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१७-१८ च्या अहवालानुसार देशात बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगसाठी १८.२ लाख, तर बॅचलर आॅफ टेक्नोलॉजीसाठी २१.१९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीच्या आणखी १९ उपशाखा आहेत. त्यातही मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या पाच सगळ्यात जास्त मागणी असणाºया उपशाखा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
देशात १.९२ लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर ३८,७१४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. साठी प्रवेश घेतला आहे. पीएच.डी.साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त ५,३४९ विद्यार्थी आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा क्रमांक लागतो. त्यासाठी ५,२३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३५,९६७ इतकी आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रवेशात महाराष्ट्र दुसरा
पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसºया स्थानी असून त्यांची संख्या २ लाख इतकी आहे, तर ३ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांसह तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे.