अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू

By admin | Published: May 26, 2017 04:16 AM2017-05-26T04:16:44+5:302017-05-26T04:16:44+5:30

राज्यभरातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू होत असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे गुरुवारी जाहीर केले.

Engineering course will start from June 5 | अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू होत असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे गुरुवारी जाहीर केले. ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्राची सोय कोी आहे. अर्ज भरण्यासाठी असलेली केंद्रे ही सुटीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहेत. राज्य सीईटी सेलतर्फे जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार बारावी उत्तीर्ण आणि सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठीच्या केंद्रांची यादी  www.dtemaharashtra.gov.in/fe2017 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रक
आॅनलाइन अर्ज : ५ जून ते १७ जून
कागदपत्रांची तपासणी, सुधारणा - ५ जून ते १७ जून
संभाव्य गुणवत्ता यादी : १९ जून
यादीवर हरकती मांडणे - २० जून ते २१ जून (सायं. ५ पर्यंत)
अंतिम गुणवत्ता यादी - २२ जून
कॅप राउंडचे संभाव्य वेळापत्रक
कॅप राउंडसाठी यादी प्रसिद्ध : २२ जून
आॅप्शन फॉर्मचे आॅनलाइन सादरीकरण : २३ जून ते २६ जून
कॅप राउंडसाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध - २८ जून संध्या. ५ वाजेपर्यंत
एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २९ जून ते ३ जुलै
कॅप राउंड दोनसाठी यादी - ५ जुलै
आॅप्शन फार्मचे आॅनलाइन सादरीकरण - ५ जुलै ते ८ जुलै
तात्पुरती यादी - १० जुलै
एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - ११ जुलै ते १४ जुलै
कॅप राउंड तीनसाठी यादी - १६ जुलै
आॅप्शन फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी वेळ - १६ जुलै ते १९ जुलै
तात्पुरती यादी - २१ जुलै
एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २२ जुलै ते २४ जुलै

Web Title: Engineering course will start from June 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.