इंजिनीअरिंग फार्मसी सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 11:13 PM2020-11-28T23:13:08+5:302020-11-28T23:22:28+5:30

CET results : परीक्षेत पुण्याच्या सानिका गुमास्ते आणि सौरभ जोग यांनी पीसीएम ग्रुप मध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने शंभर पर्सेंटाइल गुण मिळवून यश संपादन केले आहे.

Engineering Pharmacy CET results announced | इंजिनीअरिंग फार्मसी सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम

इंजिनीअरिंग फार्मसी सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम ग्रुपमध्ये पुण्याची सानिका प्रथम

Next
ठळक मुद्देराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १३८ परीक्षा केंद्रांवर आणि महाराष्ट्र बाहेर १० अशा १९७ परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली होती.

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत पुण्याच्या सानिका गुमास्ते आणि सौरभ जोग यांनी पीसीएम ग्रुप मध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने शंभर पर्सेंटाइल गुण मिळवून यश संपादन केले आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १३८ परीक्षा केंद्रांवर आणि महाराष्ट्र बाहेर १० अशा १९७ परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले.

परीक्षेस ७१.२७ टक्के विद्यार्थी उपस्थित तर २८.७३ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यातही १ लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थी पीसीएम ग्रुपसाठी तर २ लाख ११ हजार ९२५ विद्यार्थी पीसीबीग्रुपची परीक्षा दिली होती. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शनिवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला असून पीसीएम ग्रुप मधील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल तर पीसीबी ग्रुप मधील १९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

Web Title: Engineering Pharmacy CET results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.