अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: August 12, 2016 04:44 AM2016-08-12T04:44:06+5:302016-08-12T04:44:06+5:30
पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे
मुंबई : पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे. अभ्यासाच्या तणातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली सुरभि ही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. ती आयसीएम बॅचमध्ये होती. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती आपल्या रूममेटसह परीक्षेला निघाली. काही तरी विसरले असल्याचे सांगून ती पुन्हा रूमकडे आली. त्यानंतर सातव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना समजताच खळबळ उडाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण उघड झाले नसले तरी तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)