अभियंत्यांकडून बेकायदा बांधकामे तोडा
By Admin | Published: April 20, 2015 02:33 AM2015-04-20T02:33:02+5:302015-04-20T02:33:02+5:30
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत शहर अभियंता, प्रभाग समितीतील अभियंता, शहर विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता,
भिवंडी : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत शहर अभियंता, प्रभाग समितीतील अभियंता, शहर विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक आदी तांत्रिक अधिकाऱ्यांकडे अनधिकृत बांधकामांची तोड कारवाई सोपवावी, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने पालिकेकडे करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कामकाज पाच प्रभागांतून केले जाते. प्रत्येक प्रभागाच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी बीट निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. तसेच भूभाग लिपिकाकडूनही बांधकामांची माहिती मागविली जाते. अशा वेळी विकास अधिकाऱ्यांकडून तसेच शहर अभियंता व इतर अभियंत्यांकडून कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या कारवाई होणे अपेक्षित असताना प्रभाग अधिकाऱ्यांकडून एमआरटीपीनुसार पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या जातात. अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम मनपातील बांधकाम विभागातील अभियंत्यांवर सोपविण्याची मागणी भ्महासंघाचे युनिट अध्यक्ष भानुदास भसाळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)