अभियंत्याने केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम

By admin | Published: March 12, 2015 01:45 AM2015-03-12T01:45:28+5:302015-03-12T01:45:28+5:30

आयआयटी अभियंता प्रवीण मनवरने पत्नी व मुलीच्या केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले

The engineers kept the mystery behind the killings | अभियंत्याने केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम

अभियंत्याने केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम

Next

कारंजा लाड (जि. वाशिम) : आयआयटी अभियंता प्रवीण मनवरने पत्नी व मुलीच्या केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत त्याचे कुटुंबीयही अस्वस्थ आहेत. पोलिसांनी प्रवीणला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे केंद्र शासनाच्या ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’मध्ये अभियंतापदी कार्यरत असलेल्या प्रवीण ज्ञानेश्वर मनवर (३८, रा. कारंजा (लाड) जि. वाशिम ) याने कार पेटवून, पत्नी व मुलींसह ती १0 मार्चला मध्य प्रदेशातील मुलताई येथे दरीत ढकलून दिली होती. समाजमन सुन्न करणाऱ्या या हत्याकाडांतील आरोपी प्रवीणचे कुटुंब हे मुळचे कारंजा लाड तालुक्यातील वाई कांरजा येथील आहे. प्रवीण यांचे वडील ज्ञानेश्वर मनवर पुलगाव येथे जवाहर नवोदय विद्यालयात प्राचार्य होते. तर त्यांचे पाच काका शासकीय सेवेतच उच्च पदावर कार्यरत होते. प्रवीणला राजदीप हा एक भाऊ असून तो वाशिम शाळेत शारीरिक शिक्षक आहे. प्रवीणच्या दोन बहिणी उच्च शिक्षित आहेत. प्रवीणची पत्नी शिल्पादेखील अभियांत्रिकीची पदवीधर होती. उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबात हत्याकांड घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The engineers kept the mystery behind the killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.