अभियंत्यांना मिळणार रोजगाराची ‘ऊर्जा’ !

By admin | Published: February 16, 2015 03:52 AM2015-02-16T03:52:29+5:302015-02-16T03:52:29+5:30

ऊर्जा विभागाच्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपन्यांमध्ये मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेच्या अभियंत्यांना

Engineers will get 'energy' of employment! | अभियंत्यांना मिळणार रोजगाराची ‘ऊर्जा’ !

अभियंत्यांना मिळणार रोजगाराची ‘ऊर्जा’ !

Next

मुंंबई : ऊर्जा विभागाच्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपन्यांमध्ये मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेच्या अभियंत्यांना आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेरोजगार सिव्हिल इंजिनीअर्सना सार्वजनिक बांधकाम खात्यात कामे देण्याची पद्धत असून, वीज क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी आता ऊर्जा विभागाकडूनही हाच कित्ता गिरविण्यात येणार आहे.
ऊर्जा विभागाला वीजगळती, वीजहानीसह उर्वरित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. शिवाय ऊर्जा विभागाचा कारभारही धीम्या गतीने सुरु असल्याने वीजतज्ज्ञांकडून कायमच त्यांच्या कार्यावर सातत्याने टिका होत असते. परिणामी हाच कारभार आता गतीशील आणि कार्यक्षम करण्यासाठी ऊर्जा विभागाने पुढाकार घेतला आहे. वांद्रे येथील प्रकाशगड मुख्यालयात नुकतेच झालेल्या बैठकीनंतर ऊर्जा क्षेत्राला गतीमान करण्यासह कारभार सक्षम करण्यासाठी ‘रोड मॅप’ हाती घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
प्रामुख्याने यात बेरोजगार अभियंत्यांच्या कौशल्याला संधी देण्यात येणार आहे. या अंतर्गत वीजहानी कमी करण्यासह वीजगळती थांबविण्यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Engineers will get 'energy' of employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.