तेरावीसाठी ‘सीबीजीएस’चा सुधारीत अभ्यासक्रम लागू
By admin | Published: June 8, 2016 03:26 AM2016-06-08T03:26:18+5:302016-06-08T03:26:18+5:30
मुंबई विद्यापीठाने तेरावीच्या अभ्यासक्रमात बदल केल्याची घोषणा मंगळवारी केली.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने तेरावीच्या अभ्यासक्रमात बदल केल्याची घोषणा मंगळवारी केली. ‘सीबीजीएस’पद्धतीचा अवलंब करीत नवा अभ्यासक्रम लागू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अभ्यासक्रमासोबतच विद्यापीठाचे कामकाज सुरळीत व्हावे म्हणून अन्य महत्त्वपूर्ण निर्णयही विद्यापीठाने घेतल्याचे सांगितले. याविषयीची माहिती देणारी बैठक मंगळवारी दीक्षांत विभागात पार पडली. यावेळी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले की, पदवीच्या प्रथम आणि द्वीतीय वर्षातील सत्राच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून तयार केल्या जाणार आहेत. शिवाय परीक्षांसाठी सर्वसमावेशक वेळापत्रकही तयार केले जाईल. बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी अंतर्गत गुणांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला आहे. मात्र ‘सेल्फ फायनान्स’ अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत परीक्षा सुरु राहणार आहे. उत्तरपत्रिका गहाळ होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. (प्रतिनिधी)