‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ आजार होणार सुसह्य

By admin | Published: February 14, 2016 01:43 AM2016-02-14T01:43:13+5:302016-02-14T01:43:13+5:30

सांधे, मान, पाठीच्या कण्यात होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे अनेक जण त्रस्त असतात. औषधोपचार करूनही गुण येत नसल्यामुळे ‘काय करायचे?’ ही चिंता त्यांना सतावत असते. सकारात्मक

Enriching Spritical Disease | ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ आजार होणार सुसह्य

‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ आजार होणार सुसह्य

Next

मुंबई : सांधे, मान, पाठीच्या कण्यात होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे अनेक जण त्रस्त असतात. औषधोपचार करूनही गुण येत नसल्यामुळे ‘काय करायचे?’ ही चिंता त्यांना सतावत असते. सकारात्मक दृष्टिकोन, योगसाधना, व्यायाम, डाएटमुळे ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ कशा प्रकारे
सुसह्य होतो, याचे प्रशिक्षण
जगदीश ब्रामटा २१ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे होणाऱ्या शिबिरात देणार आहेत.
संधिवात अथवा स्पॉण्डिलायटिसपेक्षा तीव्र वेदना ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्तांना होतात. या आजाराला ‘बांबू बॅक’ असेही संबोधतात. कारण, या आजारात मणका, सांधे घट्ट होतात. त्यामुळे या व्यक्तींना हालचाल करणेही कठीण होते. या वेदना सुसह्य करण्याचे प्रशिक्षण सकाळी साडेनऊ ते चार या वेळेत २१ फेब्रुवारी रोजी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथील ‘द वेस्ट साइड बँक्वेट हॉल’मध्ये देण्यात येणार आहे. या एकदिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार या आजाराचे स्वरूप बदलते. अ‍ॅलोपॅथीमध्ये या आजारासाठी विशिष्ट औषध नाही. पण औषधांबरोबरच हा आजार सुसह्य करून सामान्य आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर योगसाधना, प्राणायाम, डाएटची योग्य सांगड असणे आवश्यक आहे. ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ ग्रस्तांना हे उपाय आणि आयुर्वेदानुसार एएस म्हणजे काय? हे या एकदिवसीय शिबिरात शिकविले जाणार असल्याची माहिती ब्रामटा यांनी दिली. या शिबिरात नोंदणी करताना एक पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासी पुरावा, ओळखपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर ‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ग्रस्तांकडे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असल्यास तेदेखील सोबत आणावे. हे शिबिर जनजागृतीसाठी आहे. उपचार घेत असलेल्या डॉक्टरला या शिबिराविषयी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी ९३२२२९५२२२ या क्रमांकावर जगदीश ब्रामटा यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराविषयी अधिक माहिती #ऌङ्म’्र२३्रूअस्रस्र१ङ्मंूँळङ्मअर हे फेसबुक पेज उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)

कुठे होणार शिबिर?
द वेस्ट साइड बँक्वेट हॉल, तळमजला,
गोरेगाव स्पोर्ट्स क्लब,
टोयोटा शोरूमजवळ
मालाड पश्चिम, मुंबई : ६४
कुठे करायची नोंदणी?
प्रदीप बांका : शाह ट्रेड सेंटर, तिसरा मजला, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई : ४०००९७. वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत. (९३२०४२०१२६)
कमल भंडारी : शांती हाइट्स,
फ्लॅट क्र. ४०१, सेक्टर ३५,
प्लॉट क्र. ५५, कामोठे, नवी मुंबई. वेळ : सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत (८४५१९०७०२४)
कैलाश रोंगटा : रूम क्र. ४, २१०/२१२, दुसरा मजला, जी ९ च्या वर, काळबादेवी रोड, मरिन लाइन्स, मुंबई : ४००००२. वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत. (९३२०८३५५५१)
सुनील नागदा : ए ६२/६३ चिनार, रफी अहमद किडवई मार्ग, उगांडा पेट्रोल पंपापुढे, वडाळा (पश्चिम), मुंबई : ४०००३१. वेळ : सकाळी
१० ते दुपारी १२ वाजेपर्यंत. (९३२०४२०१२६)
च्ई-मेलद्वारे नोंदणी करण्यासाठी रोहित कनोडिया (९९७१२९०८०८) यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणीसाठी  holisticapproach.as@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल करायचा आहे.
‘अ‍ॅन्किलॉयझिंग स्पॉण्डिलायटिस’ची लक्षणे : पाठदुखी, गुडघे दुखणे, खांदेदुखी, मणक्यात दुखणे, मणका, सांध्यावर ताण येऊन तीव्र वेदना, पोट दुखणे.

Web Title: Enriching Spritical Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.