कोकणात जगबुडी नदीवरचं पुराच पाणी ओसरलं, मात्र वाहतूक बंद
By admin | Published: September 23, 2016 09:34 AM2016-09-23T09:34:37+5:302016-09-23T10:37:47+5:30
कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कोकणातल्या जगबुडी नदीला पूर आला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चिपळूण, दि. २३ - कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कोकणातल्या जगबुडी नदीला पूर आला आहे. गुरुवारी रात्री खेडमधून वाहणा-या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाणी पूलावरुन वाहू लागले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहूतक बंद आहे.
जगबुडी नदीवरील पुराचे पाणी ओसरले असले तरी, पूल नीट असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. चिपळूणलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. चिपळूणमध्ये आता पाऊस थांबला असला तरी, अन्यत्र पाऊस सुरु आहे.
दरम्यान परशूराम घाटात दरड कोसळली होती. ही दरड हटवण्याचे काम सुरु असून, एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे चिपळूण अंतर्गत वाहतूक सुरु झाली आहे. चिपळूणमध्ये ट्रकच्या रांगा लागल्या असून, आता कराडमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे कोकणातील जगबुडी चोरद आणि नारींगी नदीला महापूर आला होता. मागच्या महिन्यात महाडमध्ये मुसळधार पावसामुळे सावित्री नदीवरील जुना पूल वाहून गेला. या दुर्घटनेमध्ये दोन एसटी बससह काही वाहने वाहून गेली. या दुर्घटनेत २५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.