अभियांत्रिकी महाविद्यालयांचा फास आवळणार!

By admin | Published: September 19, 2016 02:01 AM2016-09-19T02:01:28+5:302016-09-19T02:01:28+5:30

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील दोषी अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली

Entrance to the engineering college! | अभियांत्रिकी महाविद्यालयांचा फास आवळणार!

अभियांत्रिकी महाविद्यालयांचा फास आवळणार!

Next


मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील दोषी अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली आहे. प्रशासनाला खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्या महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे. संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, एआयसीटीईचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव व अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली. यावेळी दोषी महाविद्यालयांवर कडक कारवाई करताना विद्यार्थ्यांचे
नुकसान होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला.
याआधी एआयसटीईने कारवाई केल्यानंतर काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी न्यायालयातून प्रवेशबंदीविरोधात स्थगिती मिळवलेली आहे. मात्र काही महाविद्यालयांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रशासनाने विद्यार्थी स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Entrance to the engineering college!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.