प्रवेशपूर्व प्रक्रिया १ जूनपासून
By admin | Published: May 31, 2017 04:38 AM2017-05-31T04:38:49+5:302017-05-31T04:38:49+5:30
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपूर्व प्रक्रिया बंधनकारक आहे. बारावीनंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपूर्व प्रक्रिया बंधनकारक आहे. बारावीनंतर जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी १ जूनपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी), बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (आयटी), बीएससी (नॉटिकल सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी (एव्हिएशन), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अॅण्ड आय), बीकॉम (ए अॅण्ड एफ), बीकॉम (एफ अॅण्ड एम), बीएमएस, बीएमएस- एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना े४े.्िरॅ्र३ं’४ल्ल्र५ी१२्र३८.ंू या संकेतस्थळावरील पूर्व प्रवेशासाठी एक विशेष लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना अडचणी आल्यास ९३२६५५२५२५ या विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज विक्री - ३१ मे ते १५ जून (कार्यालयीन दिवस)
प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया - १ जून ते १६ जून
प्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख - १६ ते २२ जून (४.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस)
पहिली मेरीट लिस्ट - २२ जून - सायंकाळी ५ वाजता
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २३ ते २८ जून ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)
दुसरी मेरीट लिस्ट - २८ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २९ जून ते १ जुलै ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)
तृतीय आणि शेवटची मेरीट लिस्ट - १ जुलै सायंकाळी ५ वाजता
कागदपत्रे पडताळणी आणि
शुल्क भरणे- ३ते ५ जुलै सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)