उद्योजक जे. डी. थोटे यांचे निधन
By Admin | Published: February 13, 2016 11:41 PM2016-02-13T23:41:53+5:302016-02-13T23:41:53+5:30
आष्टा (जि. सांगली) येथील श्वेतक्रांतीचे जनक, जे. डी. थोटे दूध डेअरीचे मालक, सुप्रसिद्ध उद्योजक जे. डी. तथा जंबूराव दादा थोटे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री साडेअकराला वृद्धापकाळाने
आष्टा : आष्टा (जि. सांगली) येथील श्वेतक्रांतीचे जनक, जे. डी. थोटे दूध डेअरीचे मालक, सुप्रसिद्ध उद्योजक जे. डी. तथा जंबूराव दादा थोटे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री साडेअकराला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी शीतल, मुलगा राहुल व नातवंडे असा परिवार आहे.
थोटे यांनी प्रारंभीच्या काळात आष्टा परिसरात सायकलवरून दूध एकत्र करून ते सांगली येथे विक्री केले. जिद्द, चिकाटी व अहोरात्र कष्ट करीत त्यांनी आष्टा परिसरात ‘थोटे दूध’ नावाने डेअरी सुरू केली व ती राज्यात नावारूपास आणली. माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील, माजी आमदार विष्णुअण्णा पाटील यांचे ते घनिष्ठ सहकारी होत. वसंतदादा शेतकरी बॅँक, सांगलीतील दामाणी हायस्कूल, वसंतदादा दंत महाविद्यालय यांचे ते संचालक होते. (वार्ताहर)