पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले

By admin | Published: May 19, 2016 06:06 AM2016-05-19T06:06:35+5:302016-05-19T06:06:35+5:30

‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून

Entrepreneurs have come to save water | पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले

पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले

Next


मुंबई : राज्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाणी बचतीची मोहीम सुरू झाली आहे. जळगाव येथील उद्योजकांनीदेखील या अभियानात पुढाकार घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जळगावमध्ये या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या बैठकीत त्यांच्या कंपनीत पाणी बचतीसाठी शक्य तेवढा पाण्याचा कमी वापर केला जाईल. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जलपुनर्भरण यंत्रणा उभारू, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कामगारांमध्ये प्रबोधन करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
या बैठकीस जिंदा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, जिंदा संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, लघु उद्योग भारतीचे अंजनीकुमार मुंदडा, लघु उद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार तापडिया, एम़ सेक्टरचे संचालक अरुण बोरोले, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे उपस्थित होते.
कोल्हापूर येथील मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीयांनी हात धुतलेले तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाऊ न देता आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविण्यासाठी वापरले आहे.
या पाणी बचतीच्या प्रयत्नांबाबत गौरव सांगलीकर यांनी सांगितले की, मंगेशकरनगरमधील आमच्या बंगल्यात आई-वडिलांसह मी राहतो. बंगल्याच्या आवारात विविध फळे व फुलांची झाडे आम्ही लावली आहेत. सध्याच्या दुष्काळी स्थितीत पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा स्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करणे अथवा खरेदी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल, याचा विचार आम्ही केला़ त्यानुसार वॉश बेसिनच्या नळाखाली मोठे भांडे ठेवले. त्यात हात आणि भांडी धुतल्यानंतरचे पाणी आम्ही वाचविले. हे पाणी बंगल्याच्या परिसरातील झाडांना दररोज दिले जाते. त्यासह वॉटर प्युरिफायरमधून बाहेर पडणारे अतिरिक्त स्वरूपातील पाणी थेट परसातील झाडांना दिले जात आहे.
राज्याच्या बहुसंख्य भागात पाणीटंचाई आहे. नागपुरात अशी परिस्थिती नसली तरी भविष्याचा विचार करता पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून जनजागृतीचा प्रयत्न आहे. जलसंवर्धनासाठी शासनाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. नागपूर शहरातील नागरिकांनीही बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्ंिटंग यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळून बचत केली तर भविष्यात पाणी संकटावर मात करता येईल. जलपुनर्भरणासाठी शासन व महापालिकेच्या योजना आहेत. याचा नागरिकांनी उपयोग करून घेण्याची गरज आहे. -कृष्णा खोपडे, आमदार, नागपूर पूर्व

Web Title: Entrepreneurs have come to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.