Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:37 AM2024-10-01T11:37:30+5:302024-10-01T11:38:52+5:30

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी आणखी एका राजकीय पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे.

Entry of a new party in the election name and the sign are decided Information given by Sambhaji Raj | Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

Maharashtra Politics ( Marathi News ) :  राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या आधी एका नवीन पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. आता निवडणूक आयोगात पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी केली आहे. "महाराष्ट्र स्वराज्य पक्ष" असं या पक्षाचे नाव असणार आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. 

"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण

यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी एक पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षामुळे अनेकांची गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी सुरू झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू या नेत्यांनी एकत्र येत ही आघाडी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांचे गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. 

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट

आनंदवार्ता…! 

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,
दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !
जय स्वराज्य !

Web Title: Entry of a new party in the election name and the sign are decided Information given by Sambhaji Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.