तृप्ती देसार्इंचा दर्ग्यात प्रवेश

By admin | Published: May 13, 2016 04:30 AM2016-05-13T04:30:16+5:302016-05-13T04:30:16+5:30

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले

Entry into Trupti Desarii Dargah | तृप्ती देसार्इंचा दर्ग्यात प्रवेश

तृप्ती देसार्इंचा दर्ग्यात प्रवेश

Next

मुंबई : भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. मात्र, सध्या दर्ग्यात ज्या विशिष्ट मर्यादेपर्यंत महिलांना परवानगी आहे त्या ठिकाणापर्यंतच तृप्ती देसार्इंना प्रवेश देण्यात आला. या वेळी देसाई यांच्यासोबत महिला कार्यकर्त्या होत्या.
दर्ग्यातील ‘मजार’मध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करत तृप्ती देसाई यांनी आंदोलनाचा इशारा दिला. पुढील १५ दिवसांत महिलांना ‘मजार प्रवेश’ देण्याचे आवाहन तृप्ती देसाई यांनी गुरुवारी दर्ग्याच्या विश्वस्तांना केले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. याआधी २८ एप्रिल रोजी देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधामुळे त्यांना दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरूनच माघारी परतावे लागले होते.

Web Title: Entry into Trupti Desarii Dargah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.