मराठी पाऊल पडते पुढे! Shark Tank India मधील Startup ची आदित्य ठाकरेंकडून दखल, दिली ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 07:04 PM2022-01-28T19:04:16+5:302022-01-28T19:04:22+5:30
नाशिकमधल्या स्टार्टअप कंपनीला आदित्य ठाकरेंनी दिली भेट
सध्या सोनी टीव्ही (Sony TV) वर येणारा कार्यक्रम शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा अतिशय लोकप्रिय झालाय. यामध्ये असलेले जज म्हणजेच शार्क्स अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून स्टार्टअप मोठं करण्यासाठी मदत करत आहेत. शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकमधील इलेक्ट्रीक बाईक तयार करणाऱ्या कंपनीची पर्यायवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी २८ जानेवारी रोजी रिव्हॅम्प या कंपनीच्या कारखान्याला भेट दिली.
आदित्य ठाकरे हे बऱ्याच कालावधीपासून राज्याच्या इलेक्ट्रीक व्हेईकल धोरणासाठी काम करत आहेत. तसंच त्यांनी नुकतंच मुंबईत ९०० इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसेस आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकच्या स्टार्टअप कंपनीला भेट दिली. शार्क टँक इंडियाच्या एका क्लिपमध्ये आपल्याला याची माहिती मिळाली आणि ही कंपनी भारतीय बनावटीच्या बाईक्सचं उत्पादन करते, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय.
It's an honour to have your support @AUThackeray !@ShivSena@CMOMaharashtrahttps://t.co/RkLZUVaTLo
— Revamp Moto (@revampmoto) January 28, 2022
"काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियाच्या एका क्लिपमध्ये नाशिकमधील रिव्हॅम्प या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रीक बाईक्स तयार करणाऱ्या कंपनीबद्दल समजलं. नाशिकमध्ये असताना या यंग टीमची मी भेट घेतली. या कंपनीकडून उत्पादन घेतल्या जात असलेल्या इलेक्ट्रीक गाज्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्यासाठी आपण एमआयडीसीसोबत कसं काम करु शकतो यासंदर्भात या टीमशी चर्चा केली," असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. यासोबतच त्यांनी रिव्हॅम्पच्या टीमसोबत फोटोही शेअर केलाय. शिवाय कंपनीनंही आदित्य ठाकरे यांचे आभार मानलेत.