मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

By admin | Published: June 8, 2015 01:04 PM2015-06-08T13:04:11+5:302015-06-08T15:33:32+5:30

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Environmental Ministry Green Signal to Mumbai Coastal Road | मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याने तो राज्य सरकारच्या माध्यमातून बांधला जाईल हे स्पष्ट झाले. या प्रकल्पाल पर्यावरण मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. 
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात १५ जूनपर्यंत अधिसूचना काढण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन काढण्यात येईल. या निर्णयासाठी फडणवीस यांनी जावडेकर यांचे आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मुंबईकरांना भेट देण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Environmental Ministry Green Signal to Mumbai Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.