सव्वा दोन लाख गणेश मुर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन
By admin | Published: September 16, 2016 05:38 PM2016-09-16T17:38:32+5:302016-09-16T17:38:32+5:30
शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे
Next
>पुणेकरांनी घालून दिला आदर्श
पुणे, दि. 16 - शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ हजार कुटुंबियांनी अमोनियम बायकार्बोनेटच्या मदतीने घरच्या घरी विसर्जन केले तर उर्वरित २ लाख गणेश मुर्तींचे पालिकेल्या हौदात विसर्जन झाले. यंदा पहिल्यांदाच पर्यावरणपुरक विसर्जनाला इतक्या मोठयाप्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवणाºया पुण्याने पर्यावरण पुरक गणेश विसर्जनाचा आर्दश घालून दिला आहे.
महापालिका, एनसीएल व कमिन्स इंडियाच्या संयुक्त विद्यमाने यंदा अमोनियम बायकार्बोनेट बादलीमध्ये मिसळून त्यामध्ये गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची पध्दत विकसित करण्यात आली. त्यासाठी नागरिकांना क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून मोफत अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी घरच्या घरी गणेश मुर्तींचे विजर्सन करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये क्षेत्रिय कार्यालयामधून नागरिकांना ५५ टन अमोनियम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले. अनेक सोसायटया या उपक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या. एकूण २४ हजार २५० मुर्त्यांचे घरच्या घरी विसर्जन करण्यात आले. पाण्यामध्ये गणेश मुर्ती विरघळल्यानंतर ते द्रावण झाडांसाठी खत म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण न होता चांगले खत या उपक्रमातून मिळू शकले.
महापालिकेकडील नोंदीनुसार शहरात एकूण ३ लाख ५३ हजार ८८९ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी पालिकेच्या हौद व लोखंडी टाक्यांमध्ये २ लाख ५ हजार ९४ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन घाट, नदीपात्र, विहीर यामध्ये ९३ हजार ६९६ गणेश मुर्ती विसर्जित करण्यात आल्या. महापालिका, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, एनसीएल, कमिन्स इंडिया व इतर स्वंयसेवी संस्थांकडून सातत्याने पर्यावरण पुरक विसर्जनासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन याबाबत प्रबोधन करण्यात आले होते. त्यामुळे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन मोहीमेला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वाधिक गणेश मुर्तींचे विसर्जन शेवटच्या दहाव्या दिवशी झाले. हौदामध्ये ८३ हजार ४८१ व लोखंडी टाक्यांमध्ये ३० हजार ९६५ मुर्त्यांचे दहाव्या विसर्जन झाले. पहिल्या दिवशी ३२६ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. दुसºया दिवशी १४ हजार ७८१ मुर्ती विसर्जित झाल्या.