एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:50 AM2017-07-31T03:50:19+5:302017-07-31T03:51:20+5:30

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी

ephaayaara-daijaitala-savarauupaata-ghayaa | एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

Next

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी, तसेच मोबाइलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली.
राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. पोलीस दलाच्या ‘दक्षता’ मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे, तसेच मासिकाच्या फेसबुक पेजचे अनावरणही या वेळी करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, ‘पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाºयांकडे नवनवीन कल्पना आहेत. या कल्पना एकत्रित करून, त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात गुन्हे व गुन्हेगारी माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली (सीसीटीएनएस) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. त्याचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामात वाढविण्यासाठी पोलीस अधिकाºयांनी प्रयत्न करावेत,’ असेही त्यांनी पुढे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री केसरकर व डॉ. रणजित पाटील यांची भाषणे झाली. पोलीस महासंचालक माथुर व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या योजनांचे सादरीकरण केले. या वेळी अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, आस्थापना विभागाचे राजेंद्रसिंंह, नियोजन व तरतूद विभागाचे लक्ष्मीनारायण अधिकारी उपस्थित होते.

Web Title: ephaayaara-daijaitala-savarauupaata-ghayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.