इफेड्रीन प्रकरण - आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

By admin | Published: June 27, 2016 10:56 PM2016-06-27T22:56:25+5:302016-06-27T22:56:25+5:30

सुमारे 23 हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील आरोपी राजेंद्र डिमरी, मनोज जैन आणि बाबा धोत्रे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवार्पयत लांबणीवर पडली आहे.

Ephedin Case - Prolong the hearing on the bail application of the accused | इफेड्रीन प्रकरण - आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

इफेड्रीन प्रकरण - आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

Next

ठाणे: सुमारे 23 हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील आरोपी राजेंद्र डिमरी, मनोज जैन आणि बाबा धोत्रे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवार्पयत लांबणीवर पडली आहे. एव्हॉन लाईफसायन्सेस या कंपनीतून ठाणो पोलिसांनी हस्तगत केलेल्या इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीनची पुनर्रतपासणी करण्याची मागणी सोमवारी आरोपींच्या वकीलांनी ठाणो जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एच. पटवर्धन यांच्याकडे केली. त्यावर आतार्पयतच्या नुमन्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने पोलिसांना दिले.
जैन याच्यासह तिघांच्या जामीन अर्जावर तसेच क्लेयरिंग आणि फॉरवर्डीग शिपिंग कंपनीचा संचालक सुशिलकुमार असिकन्नन याच्या अटकपूर्व जामीनवरील सुनावणी सोमवारी होती. या अर्जावरील युक्तीवाद मंगळवारी घेण्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, सोलापूरच्या एव्हॉनमधून पोलिसांनी हस्तगत केलेले इफेड्रीनच्या नमुण्यांचा अहवालावरच जैन यांच्या वकीलांनी आक्षेप घेतला. त्यामुळे या सर्व तपासण्या पुन्हा करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली. आतार्पयत 43 नमुन्यांचे अहवाल आले असून 58 नमुन्यांचे अहवाल येणो बाकी असल्याचे विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी सांगितले. उर्वरित नमुन्यांचा अहवाल येईर्पयत पुनर्रतपासणी बाबतची सुनावणी होऊ नये, अशीही त्यांनी मागणी केली. सर्व नमुन्यांचा एकत्रित अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. एव्हॉन लाईफसायन्सेस कंपनी औषध निर्मिती करणारी असल्याचे जैन यांच्या वकीलांनी निदर्शनास आणले. तेंव्हा कंपनी औषध निर्मिती करणारी असली तरी ती इफेड्रीनचा मादक पदार्थाच्या निर्मितीसाठी तस्करी करीत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. जामीन अर्जावर दुस:यांदा सुनावणी लांबणीवर पडल्याने आरोपीच्या नातेवाईकांचा हिरमोड झाल्याचे स्पष्ट दिसत होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Ephedin Case - Prolong the hearing on the bail application of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.