इफेड्रीन प्रकरण: एव्हॉनच्या संचालकासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल होणार
By admin | Published: June 22, 2016 06:57 PM2016-06-22T18:57:35+5:302016-06-22T18:57:35+5:30
संचालक मनोज जैन याच्यासह सहा जणांविरुद्ध अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर साठ्याप्रकरणी ठाणे न्यायालयात पोलिसांकडून येत्या दोन दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 22 - सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात इफेड्रीनची तस्करी करणारा कंपनीचा संचालक मनोज जैन याच्यासह सहा जणांविरुद्ध अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर साठ्याप्रकरणी ठाणे न्यायालयात पोलिसांकडून येत्या दोन दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. याआधी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी याच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
एव्हॉन लाईफसायन्सेस या कंपनीत खोकल्यावरील औषधाची निर्मिती केली जात होती. हे औषध मुख्यत्वे अमेरिकेच्या एका नामांकित कंपनीकडून खरेदी केले जात होते. या कंपनीने त्यावर 2004 मध्ये बंदी आणल्यानंतर यातील इफेड्रीनचा मोठा साठा एका गोदामात पडून होता. कंपनीला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी मनोज जैनसह तीन संचालकांनी पालघर जिल्हयातील पुनीत ङ्म्रींगी याची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. पुनितनेच पुढे काही कामगारांना हाताशी धरुन इफेड्रीनवर प्रक्रीया करुन ते शुद्ध केले. तीच पावडर पुढे एमडी तसेच वेगवेगळया मादक पदार्थाच्या नावाखाली गुजरात, हैद्राबाद, केनिया तसेच युरोप आणि दुबईतही विकला गेला. यातून पुनितकडून मनोजला 85 लाख रुपये मिळाले. विकी गोस्वामी याच्याकडून एव्हॉनला सुमारे 65 लाख रुपये दिले गेल्याची माहितीही पुनितच्या चौकशीत समोर आली आहे. याव्यतिरिक्तही त्याने करोडो रुपये दिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आहेत. तर आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, जयमुखी, किशोर राठोड, सुशिल सुब्रमण्यम, तांजानियाचा डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार हे यांच्या केनियात अनेकदा बैठका झाल्या.
ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 14 एप्रिल 2016 रोजी या कंपनीत धाड टाकून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोघांना अटक केली. त्यानंतर या कंपनीतून सुमारे 23 टन इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीन तसेच अॅसेटीक अनहायड्रेड द्रव असा अडीच हजार कोटींचा माल जप्त केला.कंपनीतील 80 ते 90 कामगार तसेच संचालक जैन, अजित कामत आणि राजेंद्र कैमल यांच्या चौकशीनंतर जैनला अटक केली. आतार्पयत मयूर सुखदरे, सागर, पुनित, हरदिप गिल, जरेंद्र काचा आणि बाबा धोतरे आदी दहा जणांना अटक केली आहे.
कंपनीत किती कच्च माल आला, किती विकला गेला, त्यातील नेमका किती अधिकृत दाखवला तर किती बेकायदेशीर होता, याबाबतच्या कोणत्याही अधिकृत नोंदी नाहीत. जो माल नष्ट करणो आवश्यक होते. तो नष्ट न करता त्यावर प्रक्रीया करुन त्याची या संपूर्ण टोळीने तस्करी केली. तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग , अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडेही कोणत्याच नोंदी नाहीत. अशा अनेक बाबी ठाणो पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात नोंदविल्या आहेत.
पुनितने कंपनीवर धाड पडल्यानंतर आपले मोबाईल बंद केले होते. तो अनेक दिवस पसार झाला होता. जयमुखीनेही अशाच प्रकारे पोलिसांना चकवा दिला. अखेर त्यालाही नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यातूनच त्यांचा या तस्करीतील सहभाग अधिक स्पष्ट होत असल्याचे आरोपपत्रत म्हटले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.