इफेड्रीन : अमेरिकन पोलिसांनी दिले ममता आणि विकी विरुद्धचे महत्त्वाचे दुवे
By Admin | Published: August 10, 2016 10:00 PM2016-08-10T22:00:18+5:302016-08-10T22:00:18+5:30
सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ठाणो पालिसांनी 20 टन इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीन तसेच तीन टन अॅसेटीक अनहायड्रेड असा 23 टनाचा अडीच
- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 10 - सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ठाणो पालिसांनी 20 टन इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीन तसेच तीन टन अॅसेटीक अनहायड्रेड असा 23 टनाचा अडीच हजार कोटींचा अंमली पदार्थ हस्तगत केला. आतापर्यंत प्रकरणी दहा जणांना अटक केली असून आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि एकेकाळची अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यासह पाच जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणो पोलिसांनी अमेरिकन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे भारतातील प्रमुख डेरीक ओडने यांना दिली. तर ओडने यांनी विकी आणि ममता संदर्भातील काही महत्त्वाचे दुवे ठाणे पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ओडने यांच्या पथकाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मंगळवार आणि बुधवार अशी दोन दिवस भेट घेऊन या प्रकरणाशी संबंधित आरोपी तसेच इतर दुव्यांबाबत चर्चा केली. आतार्पयत एव्हॉनचा संचालक मनोज जैन याच्यासह दहा जणांना अटक केली असून आंतरराष्ट्रीय ड्रगमाफीया विकी गोस्वामी, अभिनेत्री ममता कुलकर्णी, किशोर राठोड, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचा साथीदार अशा पाच जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणो पोलिसांनी सांगितले. विकी आणि ममता केनियात असून त्यांचे व्हॉटसअॅप, मोबाईलवरील संभाषण फेसबुक, इमेल वरील पत्रव्यवहार आणि बँक खात्यातील तपशील देण्याची मागणी या अमेरिकन पथकाकडे करण्यात आली. त्यापैकी काही महत्त्वाचे दुवे ठाणो पोलिसांना दिल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. आता हिच माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार असून तिच्या आधारे रेड कॉर्नर नोटीसची प्रक्रीयाही वेगाने करण्यात येणार आहे.
इफे ड्रीन अर्थात ‘ईडी’ पावडरचा साठा जप्त केलेली सोलापुरातील कंपनी हिच भारतातील मुख्य वितरण कंपनी होती. तिथूनच अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सुरु होते. केवळ भारतातच नव्हे तर युरोप, मलेशिया आणि पोलंड आदी देशांमध्ये त्याचे वितरण या कंपनीतून केले जात होते. जय मुखी याने इफेड्रीनचा कच्च माल सोलापूरच्या कंपनीत पुरविला.
पुनित o्रींगी हा कंपनीचा संचालक मनोज जैन याच्या सांगण्यावरुन मालाची कशी तस्करी करायचा. तसेच जयमुखी आणि किशोर राठोड हे कसे देश विदेशात याचे वितरण करायचे, याचीही माहिती दिली. या सर्व माहितीची तसेच एकमेकांकडे असलेल्या पुराव्यांची खातरजमा ठाणो आणि अमेरिकन पोलिसांकडून करण्यात आली. ममता आणि विकी यांच्याविरुद्धचे भक्कम पुरावे गोळा करुन त्यांना भारतात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याचेही एका अधिका-यांने सांगितले.
सोलापूरमध्ये आणखी काही कामगारांची चौकशी...
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी ठाणो पोलिसांनी एव्हॉनमध्ये छापा टाकला तेंव्हा काही कामगारांची चौकशी झाली नव्हती. आता पुन्हा नव्याने त्यातील सात ते आठ कामगारांची चौकशी करण्यात आली. कंपनीच्या गोदामातील माल जसा बाहेर काढला जात होता तसाच नव्याने निर्मिती केलेल्या इफे ड्रीन आणि सुडोइफे ड्रीन्ही देश विदेशात पाठविण्यासाठी बाहेर काढला जात होता, अशी माहिती या कामगारांनी दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले.
‘‘ अमेरिकन पोलीस आणि ठाणो पोलिसांनी एकमेकांना नेमकी कोणती माहिती दिली. याबाबतचा तपशील देणो तपासाच्या दृष्टीने उचित ठरणार नाही. त्यामुळे ही माहिती देता येणार नाही.’’
- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे