समानतेची गुढी!

By admin | Published: April 9, 2016 04:07 AM2016-04-09T04:07:38+5:302016-04-09T04:07:38+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून परिवर्तनाची गुढी उभारली

Equality of Equality! | समानतेची गुढी!

समानतेची गुढी!

Next

सोनई (अहमदनगर) : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून परिवर्तनाची गुढी उभारली. देवस्थानच्या या निर्णयाचे सर्व स्तरांवर स्वागत होत असून, दर्शनासाठी महिलांची गर्दी होत आहे.
सुमारे ४०० वर्षांची परंपरा शुक्रवारी खंडित झाल्याने देवस्थानच्या निर्णयानंतर पुष्पा केवडकर व प्रियंका जगताप यांनी, तर सायंकाळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीच्या शिळेचे दर्शन घेतले.
अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या विरोधात अ‍ॅड. नीलिमा वर्तक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर महाराष्ट्रात हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पक्षपात पूर्णपणे निषिद्ध ठरविणारा ‘महाराष्ट्र हिंदू प्लेस आॅफ वर्शिप (एन्ट्री आॅथोरायजेशन) अ‍ॅक्ट’ नावाचा जो कायदा लागू आहे त्याची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. गुढीपाडव्याला पंचक्रोशीतील शेकडो कावडीधारकांनी पुरुषांनाही आता चौथराबंदी असताना दरवर्षीप्रमाणे प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने शिळेला जलाभिषेक केला.
त्यामुळे महिलांनाही प्रवेश देण्याचा पेच देवस्थानसमोर होता. त्यामुळे विश्वस्तांना न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दर्शनानंतर देसाई पुण्याकडे
रवाना झाल्या. पोलीस अधीक्षक
सौरभ त्रिपाठी हे दिवसभर शिंगणापुरात
तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)
> शनी चौथऱ्यावर दर्शन घेण्याची
आणि तेल वाहण्याची इच्छा मनात होती़ ती आज पूर्ण झाली़ १३ एप्रिलला कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांची भेट
घेणार आहे. देशातील सर्वच मंदिरे महिलांना खुली करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार आहे.
- तृप्ती देसाई
> आजचा आनंद ‘शॉर्ट टर्म’
महिलांना सन्मानाने प्रवेश मिळायला हवा होता. पुरुष चौथऱ्यावर गेल्याने आता महिला संतापतील या भीतीपोटी नाईलाजाने देवस्थानने महिलांना चौथरा खुला केला. आजचा आनंद हा ‘शॉर्ट टर्म’ आहे. समानतेचा लढा यशस्वी होईल, तेव्हाच खरा आनंद होईल. डॉ. दाभोलकर यांचीही आज प्रकर्षाने आठवण होत आहे.-विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
> ही भूमिका स्वागतार्ह
लिंग वा जातीभेदाला घटनेत कोणतेही स्थान नाही. हीच राज्य शासनाची भूमिका असून, त्यादृष्टीने शनिशिंगणापूरमधील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा ट्रस्टचा निर्णय स्वागतार्ह आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी केवळ कायदेच पुरेसे नसून लिंगभेदाची भावना समाजातून समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मज्जाव करता कामा नये ही भूमिका राज्य शासनाने न्यायालयात आधीच मांडली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
> देवस्थानचा निर्णय
चौथरा यापुढे स्त्री-पुरुषांसाठी खुला असेल. पुरुषांना केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीतील गंगाजल घेऊन चौथऱ्यावर जाता येत होते. आता मात्र त्यांना दररोज जाता येईल.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो़ मी अध्यक्ष असतानाच महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाला, याचा मला मनस्वी आनंद आहे़ - अनिता शेटे, अध्यक्षा, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट

 

Web Title: Equality of Equality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.