राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था स्थापन करणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 05:37 PM2021-05-19T17:37:37+5:302021-05-19T17:38:46+5:30
Four important decisions in the state cabinet meeting : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था (National Institute of Medicinal Plants NIMP) महाराष्ट्रात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी आडाळी येथे 50 एकर जागा देण्यात येणार आहे. (To establish National Institute of Medicinal Plants (NIMP) in Maharashtra; Four important decisions in the state cabinet meeting)
याचबरोबर, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय...
- इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत, त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
- राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था (National Institute of Medicinal Plants NIMP) महाराष्ट्रात स्थापन करणार. आडाळी येथे 50 एकर जागा देणार.
- दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंग वर पुल बांधणे व पुलाचे जोड रस्त्याकरीता मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.
- ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता.